एक्स्प्लोर

Zero Hour Dhangar Reservation : राज्यात धनगर आरक्षणाचा मुद्दा पेटणार? सरकार जीआर काढणार?

अकोले : राज्य सरकारकडून (Maharashtra Government)  धनगड (Dhangad) आणि धनगर (Dhangar) एकच आहेत, असा जीआर काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीनंतर शंभूराज देसाईंनी याबाबत माहिती दिली. आता या निर्णयाला महायुतीच्याच (Mahayuti) नेत्यांमधून विरोध होत असल्याचे दिसून येत आहे. सुरुवातीला विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ (Narhari Zirwal) यांनी या निर्णयाला विरोध दर्शवला. यानंतर आता राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार डॉ. किरण लहामटे (Kiran Lahamate) यांनीही महायुती सरकारला घरचा आहेर दिला आहे.  आदिवासी समाजाच्या आरक्षणाला (Reservation) धक्का लावू नका. तसं झालं तर उग्र स्वरूपाचं आंदोलन केलं जाईल, असा इशाराच डॉ.किरण लहामटे यांनी महायुती सरकारला दिला आहे. 

डॉ. किरण लहामटे म्हणाले की, धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्याचा ज्यांनी कोणी निर्णय घेतला त्यांचा मी निषेध करतो. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी 47 जमातींना आरक्षण दिलंय आणि त्यात कोणाचाही समावेश होवू शकत नाही. घटनेची कोणी पायमल्ली करू नये. धनगर समाजाला आरक्षण द्यायचे असेल तर स्वतंत्र द्या. धनगर आणि आदिवासी समाजाचा काही संबध नाही. त्यांची संस्कृती स्वतंत्र आहे. सरकार असं का विचार करतंय? किंवा काही संघटनांना का वाटतंय की आदिवासी समाजात आरक्षण मिळावं. आदिवासी समाजाच्या आरक्षणाला धक्का लावू नका. तसं झालं तर उग्र स्वरूपाचं आंदोलन केल जाईल, असा इशारा त्यांनी यावेळी दिला. 

धनगरांना स्वतंत्र आरक्षण द्यावं

ते पुढे म्हणाले की, मुंबईला जो पाणीपुरवठा होतो हा आदिवासी भागातून होतो. त्यामुळे आदिवासी समाजाला कायदा हातात घ्यायला लावू नका. धरणासाठी जमिनी आम्ही दिल्या, शोषण आमचं झालंय. घटनेने आम्हाला जे आरक्षण दिलंय त्यावर जर इतरांचा डोळा असेल तर ते चालणार नाही. आरक्षण दिलं त्याची भरती देखील होत नाही. त्यात आमच्या आरक्षणात दुसऱ्याला घुसवताय, हे निषेधार्ह आहे. सरकारने पुन्हा एकदा डोक ठिकाणावर ठेवून निर्णय घ्यावा. धनगरांना स्वतंत्र आरक्षण द्यावं, असे त्यांनी लहामटे यांनी म्हटलं आहे. 

All Shows

झीरो अवर

Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Politics: देख रहा है बिनोद…! निवडणुकीत सगेसोयरे अन् नातेवाईकांनाच उमेदवारी; कोणत्या नेत्यांच्या नातेवाईकांना उमेदवारी?
देख रहा है बिनोद…! निवडणुकीत सगेसोयरे अन् नातेवाईकांनाच उमेदवारी; कोणत्या नेत्यांच्या नातेवाईकांना उमेदवारी?
Nashik Crime news: 'माझ्यासोबत शरीरसंबंध ठेव नाहीतर घरातील व्यक्तीचा मृत्यू होईल', मांत्रिकाची महिलेली धमकी, 14 वर्षे लैंगिक अत्याचार
'माझ्यासोबत शरीरसंबंध ठेव नाहीतर घरातील व्यक्तीचा मृत्यू होईल', मांत्रिकाची महिलेली धमकी, 14 वर्षे लैंगिक अत्याचार
Supreme Court on Digital Arrest: 'तोपर्यंत देशातील कोणत्याच न्यायालयाने आरोपींना जामीन देऊ नये' डिजिटल अटकेच्या नावाखाली होणाऱ्या फसवणुकीवर सर्वोच्च न्यायालय संतप्त
'तोपर्यंत देशातील कोणत्याच न्यायालयाने आरोपींना जामीन देऊ नये' डिजिटल अटकेच्या नावाखाली होणाऱ्या फसवणुकीवर सर्वोच्च न्यायालय संतप्त
टॅरिफ बहाद्दर डोनाल्ड ट्रम्प सपशेल बॅकफूटवर! भारतातील चहा, कॉफी आणि मसाल्यांवरील 50 टक्के कर रद्द
टॅरिफ बहाद्दर डोनाल्ड ट्रम्प सपशेल बॅकफूटवर! भारतातील चहा, कॉफी आणि मसाल्यांवरील 50 टक्के कर रद्द
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

Supreme Court on Maharashtra Electon :आरक्षित जागांची संख्या 50%पेक्षा जास्त झाल्यास निवडणुकाच रोखू
Morning Prime Time News : सकाळच्या बातम्यांचा वेगवान आढावा एका क्लिकवर : 18 Nov : ABP Majha
Mumbai CNG Crisis : मुंबई आणि परिसरात कालपासून सीएनजीचा तुटवडा
Mahapalikecha Mahasangram Nanded : वाहतूक कोंडीची समस्या, नांदेड महापालिकेत कोण मारणार बाजी?
Mahapalikecha Mahasangram : पाण्याची समस्या, महिलांची सुरक्षा; Mira Bhayandar पालिकेचं राजकारण तापलं

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Politics: देख रहा है बिनोद…! निवडणुकीत सगेसोयरे अन् नातेवाईकांनाच उमेदवारी; कोणत्या नेत्यांच्या नातेवाईकांना उमेदवारी?
देख रहा है बिनोद…! निवडणुकीत सगेसोयरे अन् नातेवाईकांनाच उमेदवारी; कोणत्या नेत्यांच्या नातेवाईकांना उमेदवारी?
Nashik Crime news: 'माझ्यासोबत शरीरसंबंध ठेव नाहीतर घरातील व्यक्तीचा मृत्यू होईल', मांत्रिकाची महिलेली धमकी, 14 वर्षे लैंगिक अत्याचार
'माझ्यासोबत शरीरसंबंध ठेव नाहीतर घरातील व्यक्तीचा मृत्यू होईल', मांत्रिकाची महिलेली धमकी, 14 वर्षे लैंगिक अत्याचार
Supreme Court on Digital Arrest: 'तोपर्यंत देशातील कोणत्याच न्यायालयाने आरोपींना जामीन देऊ नये' डिजिटल अटकेच्या नावाखाली होणाऱ्या फसवणुकीवर सर्वोच्च न्यायालय संतप्त
'तोपर्यंत देशातील कोणत्याच न्यायालयाने आरोपींना जामीन देऊ नये' डिजिटल अटकेच्या नावाखाली होणाऱ्या फसवणुकीवर सर्वोच्च न्यायालय संतप्त
टॅरिफ बहाद्दर डोनाल्ड ट्रम्प सपशेल बॅकफूटवर! भारतातील चहा, कॉफी आणि मसाल्यांवरील 50 टक्के कर रद्द
टॅरिफ बहाद्दर डोनाल्ड ट्रम्प सपशेल बॅकफूटवर! भारतातील चहा, कॉफी आणि मसाल्यांवरील 50 टक्के कर रद्द
Nitish Kumar: नितीशकुमारांवर संशयकल्लोळ? भाजप अजूनही मौनात, शेवटच्या क्षणी राजीनाम्याची योजना सुद्धा बदलली! जेडीयू विधिमंडळ पक्षाची बैठकही पुढे ढकलली
नितीशकुमारांवर संशयकल्लोळ? भाजप अजूनही मौनात, शेवटच्या क्षणी राजीनाम्याची योजना सुद्धा बदलली! जेडीयू विधिमंडळ पक्षाची बैठकही पुढे ढकलली
1800 कोटींचा जमीन घोटाळा पण गुन्हा दाखल नाही; लेक अमित ठाकरेंवरील गुन्ह्याबाबत शर्मिला ठाकरे स्पष्टच बोलल्या
1800 कोटींचा जमीन घोटाळा पण गुन्हा दाखल नाही; लेक अमित ठाकरेंवरील गुन्ह्याबाबत शर्मिला ठाकरे स्पष्टच बोलल्या
Pravin Tarde Garbage On Raigad Fort: 'इथे आपल्या बापजाद्यांनी इतिहास घडवला आणि तुम्ही...'; स्वराज्याच्या राजधानीची दयनीय अवस्था पाहून प्रवीण तरडेंचा संताप
'इथे आपल्या बापजाद्यांनी इतिहास घडवला आणि तुम्ही...'; स्वराज्याच्या राजधानीची दयनीय अवस्था पाहून प्रवीण तरडेंचा संताप
Saudi Arabia Bus Accident: सौदीत मक्काहून मदिनाला बसची डिझेल टँकरला धडक; हैदराबादमधील एकाच कुटुंबातील 18 जणांचा झोपेतच जळून कोळसा; अवघा एकजण जिवंत बचावला
सौदीत मक्काहून मदिनाला बसची डिझेल टँकरला धडक; हैदराबादमधील एकाच कुटुंबातील 18 जणांचा झोपेतच जळून कोळसा; अवघा एकजण जिवंत बचावला
Embed widget