Zero Hour Guest Ambadas Danve : दानवेंचं गोऱ्हेंना पत्र, निलंबन मागे की कालावधी कमी करणार?
भेटी, बैठकांच्या बातमीनंतर.. आता पुन्हा जावूया विधिमंडळाच्या अधिवेशनात... आज चर्चा रंगली आहे ती विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंच्या निलंबनाची.. परवा, म्हणजेच १ जुलै रोजी आक्रमक भूमिका मांडताना दानवेंनी, सभागृहातच भाजप आमदार प्रसाद लाड यांना शिवीगाळ केली होती.. त्यानंतर विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हेंनी, दानवेंचं ५ दिवसांसाठी निलंबनदेखील केलं.. यावर दानवेंच्या पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरेंनी, महिलांची जाहीर माफी मागितली.. त्यानंतर दानवे यांनी एक पाऊल मागे घेत, याप्रकरणी दिलगिरी व्यक्त केली.. त्याबाबत बोलण्यासाठी थोड्याच वेळात स्वत: अंबादास दानवे झीरो अवरमध्ये उपस्थित असणार आहेत... निलंबन मागे घ्यावे, अशी विनंती करणारे पत्र, उपसभापती डॉ. निलम गोऱ्हेंंना त्यांनी दिलंय.. यावर दुपारी डॉ. निलम गोऱ्हेंंच्या दालनात बैठकदेखील पार पडली.. दानवेंच्या निलंबनाचा कालावधी कमी केला जाऊ शकतो.. याबाबतचा निर्णय झाला असून, उद्या संसदीय कार्यमंत्री त्या निर्णयाची घोषणा करतील.. अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आज विधान परिषदेत दिली...