Yeola : सत्तेसाठी भांडणारे शेतकऱ्यांसाठी कधी लढणार, उद्विग्न टोमॅटो शेतकऱ्यांच्या व्यथा 'माझा'वर
टोमॅटोला भाव मिळेल या आशेवर अनेक शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर टोमॅटोची लागवड केली. मात्र मागणी कमी आणि आवक जास्त असल्याने सध्या टोमॅटोला भाव मिळत नसल्याने मोठ्या कष्टाने पिकवलेले टोमॅटो फेकून देण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.
कोरोनाच्या काळात शेतकऱ्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले. जून महिन्यात झालेल्या पावसाच्या भरवशावर अनेक शेतकऱ्यांनी यंदा टोमॅटोला भाव मिळेल या आशेवर त्याची लागवड केली. लागवडीसाठी एकरी एक लाखा पेक्षा जास्त खर्च येतो. धमोडे येथील एका शेतकऱ्याने एक एकरात टोमॅटोची लागवड केली. त्यासाठी त्यांनी एक लाखांपेक्षा जास्त खर्च केला. मात्र परवा त्यांनी आपला माल विक्रीस आणला असता व्यापाऱ्याला 10 रुपये जाळी घ्या अशी विनंती करून सुद्धा ती न घेतल्याने संतप्त झालेल्या शेतकऱ्याच्या मुलाने रस्त्यावर सगळी टोमॅटो फेकून दिले.
All Shows
































