एक्स्प्लोर

Will Jarange march on Mumbai, or will a solution be found : मुंबईत धडकणार की तोडगा निघणार? | Special Report ABP Majha

मनोज जरांगे मुंबईत धडक देण्यासाठी तयार झालेत. १५ तारखेला मुंबईकडे कूच करण्याचा आणि १९ तारखेपासून आझाद मैदानावर आंदोलन सुरु करण्याची घोषणा केलीय. मात्र पोलिसांनी त्यांना मुंबईत आंदोलन करण्याची परवानगी नाकारलीय. गेल्या वर्षी शांततेत आंदोलन झालं असताना यंदा परवानगी का नाकारली, असा सवाल करत मनोज जरांगेंनी गृहखातं सांभाळणाऱ्या फडणवीसांवर हल्लाबोल केलाय. त्याववेळी आपल्याला ठार मारण्याचा डाव रचण्यात आल्याचा दावाही जरांगेंनी केल्यामुळं एकच खळबळ उडालीय. आज दिवसभरात नेमकं काय घडलं, याचा आढावा घेऊया, या स्पेशल रिपोर्टमधून. 

अंतरवाली सराटीत गेल्या १६ दिवसांपासून उपोषण करूनही तोडगा न निघाल्यामुळं अखेर मनोज जरांगेंनी चलो मुंबईचा नारा दिला.

मात्र मुंबईत आंदोलन करायला पोलिसांनी परवानगी नाकारली आणि अगोदरच सरकारला फैलावर घेणाऱ्या मनोज जरांगेंचा पारा चढला.

पोलिसांच्या भूमिकेसाठी मुख्यमंत्री फडणवीसांना जबाबदार धरत त्यांनी ठरल्याप्रमाणे मुंबईत धडकण्याचा नारा दिलाय. 

गेल्या वर्षीच्या गणेशोत्सवातही मनोज जरांगेंनी मुंबईत आंदोलन केलं होतं.

या वर्षी वेगळा न्याय का, असा सवाल करत मुखमंत्र्यांची हुकुमशाही सुरु असल्याचा आरोप जरांगेंनी केलाय.

पोलीस परवानगी देतील, अशी आशा अजूनही जरांगेंच्या समर्थकांना आहे.

मात्र परवानगी मिळाली नाही, तर काय करायचं, याचा प्लॅन बीदेखील त्यांनी तयार ठेवलाय. 

मनोज जरांगेंच्या आणखी एका दाव्यानं सर्वांच्याच भुवया उंचावल्यात. 

जरांगेंच्या मते सरकारनं त्यांना ठार करण्याचा कट रचलाय..

मुंबईत आल्यावर दगाफटका करण्यासाठी सरकारनं एक नॅरेटिव्हही तयार केल्याचं जरांगे सांगतायत.

सरकारनं कितीही दबाव आणला तरी 'मरण पत्करेन पण शरण येणार नाही', अशी भूमिका जरांगेंनी पत्रकार परिषदेत मांडलीय. 

मनोज जरांगे गेल्या दोन आठवड्यांपासून मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदेंवर एकेरी आणि शिवराळ भाषेत टीका करतायत.

याबाबत प्रश्न विचारला असता शिवराळ भाषेतले शब्द मागे घेण्याची तयारी जरांगेंनी दाखवलीय.

मात्र त्यासाठी त्यांची एक अट आहे. 

आतापर्यंत जरांगेंची समजूत काढण्यासाठी सरकारमधील मंत्री आणि अधिकारी जात असत.

यंदा मात्र या प्रथेला फाटा देत सरकारनं आपलं शिष्टमंडळ अंतरवालाली पाठवलं नाही.

कदाचित त्यामुळेच मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील माध्यमातील प्रतिक्रियेतूनच जरांगेंची समजूत काढताना दिसतायत. 

तर जरांगेंसह सर्व जातींच्या आरक्षणाचे प्रश्न मार्गी लावण्याचा एकच उपाय काँग्रेसला दिसतोय. 

शिंदेंच्या शिवसेनेला मात्र जरांगे मुंबईत आले काय किंवा न आले काय.. त्याने काहीच फरक पडणार नाही, असं वाटतंय. 

त्यामुळेच मुंबईत येण्यासाठी गणेशोत्सवाचा काळ टाळण्याचा सल्ला भरत गोगावलेंनी जरांगेंना दिलाय. 

तर ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारेंनी मात्र मनोज जरांगेंना थेट फैलावर घेतलंय. 

जरांगे मुंबईत आले तर पोलिसांनी काय करावं, याबाबतही त्यांनी आपलं मत जाहीरपणे मांडलंय. 

सध्या मनोज जरांगे आणि सरकारच्या प्रतिनिधींमधला थेट संवाद थांबलाय.

जरांगेंकडून होणाऱ्या टीकेला तितक्याच आक्रमकपणे सत्ताधारी पक्षाचे नेते प्रत्युत्तर देऊ लागलेत. 

त्यामुळं आता मुंबईत येण्याची घोषणा केलेले जरांगे आणि त्यांनी मुंबईत येऊ नये, यासाठी प्रयत्नशील असलेलं सरकार.. यांच्यात संघर्ष होणार की समेट होणार हे पुढच्या दोन दिवसातच स्पष्ट होणार आहे. 

All Shows

स्पेशल रिपोर्ट

Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Pune MPSC Student Protest: तातडीने जागा रिकामी करा, पुणे पोलिसांचे आदेश; MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला मोठा धक्का, एस. एम. जोशी पुलावरील आंदोलनाची परवानगी नाकारली
तातडीने जागा रिकामी करा, पुणे पोलिसांचे आदेश; MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला मोठा धक्का, एस. एम. जोशी पुलावरील आंदोलनाची परवानगी नाकारली
Nashik Accident News: रस्त्याच्या मधोमध भलामोठा खड्डा, अंधारात अंदाज चुकला अन् दुचाकीसह पडले; नाशिकमध्ये 61 वर्षीय वृद्धाचा मृत्यू
रस्त्याच्या मधोमध भलामोठा खड्डा, अंधारात अंदाज चुकला अन् दुचाकीसह पडले; नाशिकमध्ये 61 वर्षीय वृद्धाचा मृत्यू
Jay Pawar on Yugendra Pawar : युगेंद्र पवारांनी सोमेश्वरसाठी आपण एकत्र यायचं का विचारलं होतं; पार्थदादांनी सांगितलं की, 'युगेंद्र, आमचे कार्यकर्ते...', जय पवारांनी सांगितली इनसाईड स्टोरी
युगेंद्र पवारांनी सोमेश्वरसाठी आपण एकत्र यायचं का विचारलं होतं; पार्थदादांनी सांगितलं की, 'युगेंद्र, आमचे कार्यकर्ते...', जय पवारांनी सांगितली इनसाईड स्टोरी
Raj Thackeray: नानांनी पडद्यावर उभा केलेला तो माणूस अजूनही आपल्या आजूबाजूला, त्याचा राग, अस्वस्थता, अपमान, धडपड आहे; राज ठाकरेंनी नाना पाटेकरांच्या असंख्य भावनांमधील 'मनस्वी' पैलू मांडले
नानांनी पडद्यावर उभा केलेला तो माणूस अजूनही आपल्या आजूबाजूला, त्याचा राग, अस्वस्थता, अपमान, धडपड आहे; राज ठाकरेंनी नाना पाटेकरांच्या असंख्य भावनांमधील 'मनस्वी' पैलू मांडले
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Devendra Fadnavis on Nana Patekar Passes Away : भाऊ, मार्गदर्शक, मित्र हरपला; फडणवीस भावुक- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Nana Patekar Passes Away : अभिनेते नाना पाटेकर यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन
Rahul Gandhi Protest : राहुल गांधी, प्रियांका गांधी पोलिसांच्या ताब्यात UNCUT VIDEO
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीत हायहोल्टेज ड्रामा, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं
Sunetra Pawar : दादा खूप मोठ्या मनाचे होते,मी नाही; सुनेत्रा पवारांचा बंडखोरांना इशारा

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune MPSC Student Protest: तातडीने जागा रिकामी करा, पुणे पोलिसांचे आदेश; MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला मोठा धक्का, एस. एम. जोशी पुलावरील आंदोलनाची परवानगी नाकारली
तातडीने जागा रिकामी करा, पुणे पोलिसांचे आदेश; MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला मोठा धक्का, एस. एम. जोशी पुलावरील आंदोलनाची परवानगी नाकारली
Nashik Accident News: रस्त्याच्या मधोमध भलामोठा खड्डा, अंधारात अंदाज चुकला अन् दुचाकीसह पडले; नाशिकमध्ये 61 वर्षीय वृद्धाचा मृत्यू
रस्त्याच्या मधोमध भलामोठा खड्डा, अंधारात अंदाज चुकला अन् दुचाकीसह पडले; नाशिकमध्ये 61 वर्षीय वृद्धाचा मृत्यू
Jay Pawar on Yugendra Pawar : युगेंद्र पवारांनी सोमेश्वरसाठी आपण एकत्र यायचं का विचारलं होतं; पार्थदादांनी सांगितलं की, 'युगेंद्र, आमचे कार्यकर्ते...', जय पवारांनी सांगितली इनसाईड स्टोरी
युगेंद्र पवारांनी सोमेश्वरसाठी आपण एकत्र यायचं का विचारलं होतं; पार्थदादांनी सांगितलं की, 'युगेंद्र, आमचे कार्यकर्ते...', जय पवारांनी सांगितली इनसाईड स्टोरी
Raj Thackeray: नानांनी पडद्यावर उभा केलेला तो माणूस अजूनही आपल्या आजूबाजूला, त्याचा राग, अस्वस्थता, अपमान, धडपड आहे; राज ठाकरेंनी नाना पाटेकरांच्या असंख्य भावनांमधील 'मनस्वी' पैलू मांडले
नानांनी पडद्यावर उभा केलेला तो माणूस अजूनही आपल्या आजूबाजूला, त्याचा राग, अस्वस्थता, अपमान, धडपड आहे; राज ठाकरेंनी नाना पाटेकरांच्या असंख्य भावनांमधील 'मनस्वी' पैलू मांडले
Bhandara News: पालकमंत्र्यांसमोर रडत-रडत व्यथा मांडली, अधिकाऱ्यांकडून फाईल्स फेकल्याची तक्रार; दोनच दिवसांत भंडाऱ्यातील शेतकऱ्याने टोकाचं पाऊल उचललं
पालकमंत्र्यांसमोर रडत-रडत व्यथा मांडली, अधिकाऱ्यांकडून फाईल्स फेकल्याची तक्रार; दोनच दिवसांत भंडाऱ्यातील शेतकऱ्याने टोकाचं पाऊल उचललं
Sayaji Shinde On Nana Patekar Passed Away : बातम्यांवर विश्वास बसेना, 7 वाजता माहिती कळली अन्..., सुजलेले डोळे, शब्दही सुचेना, नाना पाटेकरांच्या निधनानंतर सयाजी शिंदेंना मोठा धक्का
बातम्यांवर विश्वास बसेना, 7 वाजता माहिती कळली अन्..., सुजलेले डोळे, शब्दही सुचेना, नाना पाटेकरांच्या निधनानंतर सयाजी शिंदेंना मोठा धक्का
Nana Patekar: असा 'नटसम्राट' होणे नाही! नानांकडून 'प्रहार'मधील आर्मी मेजर साकारण्यासाठी मराठा लाइट इन्फंट्रीमध्ये प्रशिक्षण अन् कारगिल युद्धातही सहभाग
असा 'नटसम्राट' होणे नाही! नानांकडून 'प्रहार'मधील आर्मी मेजर साकारण्यासाठी मराठा लाइट इन्फंट्रीमध्ये प्रशिक्षण अन् कारगिल युद्धातही सहभाग
Popatrao Pawar on Nana Patekar: नाना पाटेकरांच्या नाम फाउंडेशनची सुरुवात झालेल्या हिवरेबाजारचे पोपटराव पवार हळहळले; म्हणाले, 'आमचं या आठवड्यात नानाजींना पुण्यामध्ये भेटायचं निश्चित झालं होतं, पण दुर्दैव...'
नाना पाटेकरांच्या नाम फाउंडेशनची सुरुवात झालेल्या हिवरेबाजारचे पोपटराव पवार हळहळले; म्हणाले, 'आमचं या आठवड्यात नानाजींना पुण्यामध्ये भेटायचं निश्चित झालं होतं, पण दुर्दैव...'
Embed widget