Nashik Tree Cutting : नाशिकमध्ये झाडं तोडणारे हात नेमके कुणाचे? | Special Report ABP Majha
नाशिकमधल्या प्रसिद्ध गंगापूर रोडवरची पन्नास एक झाडं रात्रीच्या अंधारात तोडण्यात आलीय.. झाडं तोडणारे सीसीटीव्हीत कैद झालेत... मात्र ते नाशिक महापालिकेच्या नजरेतून कसे काय सुटले? असा प्रश्न आता उपस्थित होतोय.. तसंच नाशिकमधल्या झाडांचे जानी दुश्मन आहेत तरी कोण हे शोधून काढण्याचं आव्हान पोलीस आणि महापालिकेसमोर असणार आहे....
नाशिकच्या प्रसिद्ध गंगापूर रोडवरच्या दुभाजकांवर लावलेल्या झाडांची कत्तल करण्यात आलीय...
दहा ते बारा वर्षे जुनी झाडं टप्प्याटप्प्यानं कापण्यात आलीय...
आणि एक दोन नव्हे तर ५० हून अधिक झाडांचा बळी घेण्यात आलाय
नाशिकचे उपमहापौर विलास शिंदे यांनी या धक्कादायक गोष्टीकडे सगळ्यांचं लक्ष वेधलंय
धक्कादायक गोष्ट म्हणजे रोज हळूहळू झाडं कापली जात असताना महापालिका प्रशासनं काय करत होतं?
नाशिकच्या झाडांची कत्तल करणाऱ्या जोडगोळीला सीसीटीव्ही कॅमेऱ्यानं कैद केलंय
कधी कुंभमेळ्याच्या साधूग्रामसाठी...
तर कधी स्मार्ट सिटीसाठी...
तर कधी इतर कामांसाठी...
नाशकातल्या झाडांवर कुऱ्हाड चालवली जातेय..
हे कमी म्हणून की काय?...
आता कोणत्याही विकासकामांच्या आड न येणारी झाडंही कापली जात असतील तर हा नाशिककरांच्या जीवाशी खेळ म्हणावा लागेल...
त्यामुळे नाशकातल्या झाडांचे जानी दुश्मन कोण आहेत हे शोधण्याचं आव्हान पोलीस आणि महापालिका प्रशासनासमोर असणार आहे...
All Shows































