Uddhav Thackeray Nagarsevak Meeting : युतीची बात, काय मावळ्यांच्या मनात? Special Report
मुंबई महानगरपालिका निवडणूक तोंडावर आली आहे. ठाकरेंच्या शिवसेनेसोबत मोजके नेते उरले आहेत. त्यातले किती नेते.. आणखी किती दिवस सोबत राहतील; याची कोणतीही खात्री; कोणीही देऊ शकत नसेल. अशा स्थितीत उद्धव ठाकरेंनी माजी नगरसेवकांची बैठक घेतली. ५५ पैकी ४९ माजी नगरसेवक हजर झाले तर ६ जण पक्षाची परवानगी घेऊन गैरहजर राहिले. पक्षाची सध्याची अवस्था, संभाव्य गळती, युतीच्या चर्चा, शिवसेना वर्धापनदिनाच्या तयारीचा आढावा अशा विविध विषयांचा उहापोह झाला. आणखी काय घडलं.. उद्धव ठाकरे काय म्हणाले, पाहुयात हा स्पेशल रिपोर्ट
((मोंटाज- उद्धव ठाकरे, मातोश्री बैठक, तेजस्विनी वगैरे माजी नगरसेवक))
VO
नाशिकमध्ये ठाकरेंच्या सेनेला मोठं भगदाड पडलं.
जे काही उरले सुरले महत्वाचे नेते होते ते सुद्धा भाजप आणि शिवसेनेत गेले.
त्यानंतर मुंबईत खडबडून जाग आली
मुंबईतील माजी नगरसेवकांचं मन जाणून घेण्यासाठी उद्धव ठाकरेंच्या मातोश्री निवासस्थानी महत्त्वाची बैठक पार पडली.
कालच विनोद घोसाळकर आणि उद्धव ठाकरेंची भावनिक भेट झाली होती. त्यामुळे
तेजस्वी घोसाळकर उपस्थित राहणार का याकडे सर्वांचं लक्ष होतं.
तेजस्वी घोसाळकरांसह १५ ते २० माजी नगरसेवक उपस्थित होते
राज ठाकरेंच्या मनसे सोबत युती करायची का नाही हा महत्वाचा प्रश्न उद्धव ठाकरेंनी या माजी नगरसेवकांना विचारला
२ विंडो BITE- सुरेश पाटील, माजी नगरसेवक शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे
((R MUM MATOSHREE LIVE 230PM 180625))
+ अनिल कोकिळ
((R MUM MATOSHREE LIVE 145PM 180625 //// R MUM MATOSHREE LIVE 230PM 180625))
VO
GFX IN
काय म्हणाले उद्धव ठाकरे?
- येत्या ऑक्टोबर-नोव्हेंबरपर्यंत निवडणूक लागू शकते.
- मुंबई महानगर पालिकेसाठी कोणत्याही पक्षाला सोबत घेण्यापूर्वी सर्वांना विश्वासात घेतलं जाईल.
- तुम्ही सोबत राहिलात तुम्ही निष्ठावंत आहात
-येत्या काळात अनेक बैठका घ्यायच्या आहेत.
- माजी नगरसेवकांनी शिवसेना भवन येथे येऊन सामान्यांचे प्रश्न सोडवावेत
- लवकरच शिवसेना भवनात निवडणूक कार्यालय उघडणार
GFX OUT
BITE - तेजस्वी घोसाळकर+हेमांगी वरळीकर
((R MUM MATOSHREE LIVE 145PM 180625 //// R MUM MATOSHREE LIVE 230PM 180625))
VO
राज्यात सर्वदूर ठाकरेंच्या शिवसेनेतून मोठ्या प्रमाणात आऊट गोईंग सुरु आहे. गुरुवारी शिवसेनेच्या वर्धापनदिनी ठाकरेंना आणखी धक्का बसण्याची शक्यता बोलली जातेय.
मातोश्रीवर जमलेल्या सेना नेत्यांपैकी काही नेते शिंदेंच्या शिवसेनेच्या संपर्कात असल्याची चर्चा आहे, त्यामुळे ठाकरेंनी भावनिक आवाहनही केलं.
२ विंडो BITE- आशिष चेंबुरकर+रमेश कोरगावकर
VO
नाशिकमधील पडझड रोखण्यात संजय राऊतांना सपशेल अपयश आलं. तसाच प्रकार मुंबईतील उरल्यासुरल्या नगरसेवकांसोबत होईल अशी भीती ठाकरेंना वाटत असेल. आपलं भविष्य सुरक्षित करण्यासाठी मविआतील लहानथोर नेत्यांची पावलं महायुतीच्या दिशेनं पडताना दिसतायत. एकिकडे महायुतीचं सामदामदंडभेद आहे तर दुसरीकडे ठाकरेंचे अनेक दशकं यशस्वी ठरलेले भावनिक आवाहन. यात कोणाची सरशी होणार ते चित्र येत्या काही आठवड्यात स्पष्ट होईल.
ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा
All Shows

































