Supriya Sule Sunetra Pawar Baramati : 'नाही कुटुंबात लढाई' सुप्रिया सुळेंची ग्वाही Special Report
दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये विलिनीकरणाची चर्चा रंगली अन् नंतर विझली... त्याआधी बारामतीत पवार विरुद्ध पवार संघर्ष बघायला मिळाला होता... मात्र आता भविष्यात असं काही होणार नाही, अशी ग्वाही सुप्रिया सुळेंनी दिली अन् त्याचं सुनेत्रा पवारांनी स्वागतही केलं... एबीपी माझाच्या 'माझं व्हिजन' कार्यक्रमात सुळेंनी केलेलं हे विधान आणि त्यावर उमटलेल्या प्रतिक्रियांवर हा स्पेशल रिपोर्ट बघुयात...
२०२४ मध्ये झालेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये बारामतीत झालेल्या या लढती...
या निवडणुकांच्या निमित्तानं प्रथमच पवार घराण्याच्या बालेकिल्ल्यात पवार विरुद्ध पवार संघर्ष पाहायला मिळाला...
मात्र आता आपण कधीही असा सामना होऊ देणार नाही, अशी घोषणाच शरद पवारांच्या कन्या आणि त्यांच्या पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळेंनी केली...
एबीपी माझाच्या माझा महाराष्ट्र माझं व्हिजन या कार्यक्रमाच्या मंचावरून त्यांनी हा निर्धार व्यक्त केल्यानं नव्या चर्चेला वाचा फुटली...
All Shows































