अजनी-वंजारीनगर उड्डाणपुलावर स्टंटबाजी, नागपुरातील तरुणांचा धुडगूस, स्टंटबाजांना कोण आवरणार?
गृहमंत्र्यांच्या नागपुरात कायद्याचा धाक कमी होत चाललाय आहे की काय असा प्रश्न निर्माण झाला आहे, कारण ज्या दिवशी नागपूर पोलिसांचे तब्ब्ल अडीच हजार अधिकारी आणि कर्मचारी रस्त्यावर उतरून मुख्यमंत्र्यांच्या ताफ्याची सुरक्षा करत होते. त्याच दिवशी काही टवाळखोर रस्त्यावर धोकादायक स्टंटबाजी करत इतरांचे जीव धोक्यात घालत होते. नुकतंच उदघाटन झालेल्या वांजरीनगर उड्डाणपुलाचा 26 जानेवारीच्या दुपारचा एक व्हिडियो वायरल झाला आणि काही धनदांडग्यांनी वंजारीनगर उड्डाणपुलावर त्या दिवशी दुपारी काय गोंधळ घातला हे सर्वांसमोर आले. विशेष म्हणजे ज्या उड्डाणपुलावर हे धुडघुस झाले त्याचे उदघाटन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी 23 जानेवारीलाच केले होते.
































