Special Report : Thackeray Brother Alliance : #अशी ही जुळवाजुळवी, खरंच एकत्र येणार?
Special Report : Thackeray Brother Alliance : #अशी ही जुळवाजुळवी, खरंच एकत्र येणार?
आधी राज ठाकरेंनी मुलाखत दिली... मग उद्धव ठाकरेंनी भाषण केलं... आणि चांदा ते बांदा सुरू झाली, ठाकरे बंधू एकत्र येणार का ही चर्चा? महाराष्ट्राला प्रत्येक जण आपआपल्या परीने या प्रश्नाचं विश्लेषणात्मक उत्तर देतोय.. मात्र मनसेचे प्रमुख चेहरे ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याबाबत तेवढे उत्सुक दिसत नाहीय.. उलट भुतकाळ उकरून काढत ते उद्धव ठाकरेंनाच प्रश्न विचारताहेत.. दुसरीकडे, राज आणि उद्धव एकत्र येणार म्हणून महायुतीतल्या काही नेत्यांनी आनंद व्यक्त केलाय तर मविआतल्या काही नेत्यांनी मौन बाळगणं पसंद केलंय.. या आनंदाचा आणि मौनाचा नेमका अर्थ काय.. पाहुयात एबीपी माझाचा हा स्पेशल रिपोर्ट
दोन्ही ठाकरेंनी शनिवारी काही तासांच्या फरकानं असे राजकीय जुळवाजुळवीचे संकेत दिले आणि महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चेची त्सुनामी आली.
पक्षप्रमुखांचा शब्द अंतिम मानल्या जाणाऱ्या दोन्ही पक्षाच्या नेत्यांकडून प्रतिक्रियांच्या लाटांमागून लाटा जुळवाजुळवीच्या किनाऱ्यावर धडकू लागल्या.
या लाटा होत्या जुन्या आठवणी, जुने अनुभव किनाऱ्यावर वाहून आणणाऱ्या.
All Shows

































