Special Report One Day Cricket|अंडर -19 चा वन डे वर्ल्डकप बंद होणार? सौरव गांगुलीच्या समितीची शिफारस
Special Report One Day Cricket|अंडर -19 चा वन डे वर्ल्डकप बंद होणार? सौरव गांगुलीच्या समितीची शिफारस
सध्या टी२०चा जमाना आहे. वन डे क्रिकेटही अनेकांना कंटाळवाणं वाटत आहे. पण आयसीसीकडं वन डे क्रिकेटचं वलय कमी होऊ नये यासाठी अनेक प्रयत्न केले जातायत. वन डे क्रिकेटमध्ये चेंडूंसंबंधीचा एक नियम बदलला जाण्याची शक्यता आहे. काय आहे हा नियम आणि त्यामुळं वन डे क्रिकेट आणखी रंजक होणार आहे का यावरचा हा स्पेशल रिपोर्ट...
टी२०च्या उदयानंतर क्रिकेट हा गोलंदाजांचा नाही तर फलंदाजांचा खेळ आहे आणि गोलंदाजांवर कायम अन्याय होत असल्याची टीका होतेय... पण दुसरीकडे फलंदाजांना सिद्ध करण्यासाठी एकच संधी मिळते... गोलंदाजांना मात्र काही षटकं मिळतात असं त्याला उत्तर दिलं जातं यात काही अंशी तथ्य असलं तरी फलंदाज आणि गोलंदाजांमधल्या या सामन्याचा समतोल साधला जावा यासाठी सौरव गांगुलीच्या अध्यक्षतेखालील आयसीसीच्या समितीनं ही वन डे क्रिकेटमध्ये गोलंदाजांच्या पारड्यात थोडसं आपलं वजन टाकलंय.... येत्या काळात वन डे क्रिकेटमध्ये पूर्वीप्रमाणे एकाच चेंडूचा वापर केला जावा अशी शिफारस केली आहे...
All Shows

































