Shrikant Shinde Dinner Diplomacy : दिल्लीत स्नेहभोजन,महराष्ट्रात अपचन? Special Report Rajkiya Sholay
कुणी कुणाबरोबर जेवावं? कुणाच्या स्नेहभोजनाला जावं आणि कुणाचं निमंत्रण टाळावं? तसं बघायला गेलं तर हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न... पण ठाकरेंच्या शिवसेनेनं आपल्या नेत्यांसाठी यासंदर्भात अनौपचारिक आचारसंहिता लागू केल्याचं कळतंय.. आणि त्यासाठी कारण ठरलंय ठाकरे आणि शिंदेंच्या नेत्यांच्या एकत्र उठलेल्या पंगती.. दिल्लीतल्या या पंगतींची खबर गल्लीत म्हणजे महाराष्ट्रात धडकली आणि राजकीय अपचनामुळे अनेकांनी ढेकर द्यायला सुरुवात झाली... तर हे ढेकर ऐकून अनेकांनी नाकतोंड मुरडायला सुरुवात केलीय... हे राजकीय अपचनाचं प्रकरण तरी काय आहे? पाहुयात राजकीय शोलेचा हा स्पेशल रिपोर्ट
ठाकरेंच्या खासदारांनी शिंदेंच्या नेत्यांच्या घरी जाऊन लंच आणि डिनर करणं योग्य की अयोग्य असा सवाल उपस्थित झालाय..
मात्र या प्रश्नानं काही भूतकाळातील घटनांची आठवण करून दिलीय
चंद्रकांत पाटलांनी उद्धव ठाकरेंची भेट घेत त्यांना भेट म्हणून चॉकलेट दिले होते
उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना आणि देवेंद्र फडणवीस विरोधी पक्षनेते असताना, बंद दाराआड दोघांनी एकत्र कॉफी घेतल्याचीही चर्चा आहे..
पक्षनिष्ठा, विचारसरणी यांना तिलांजली देत राजकीय समीकरणासाठी अभद्र युत्या आणि आघाड्या जन्माला येतात..
मग राजकारण बाजूला ठेवून एकत्र जेवणं केलं तर त्यात वावगं काय?
की या स्नेहभोजनामुळे पक्षाला आणखी गळती लागेल अशी भीती ठाकरेंच्या शिवसेनेला सतावतेय का?
सोमेश कोलगे एबीपी माझा नवी दिल्ली
All Shows


































