Satara Solapur Rain : दुष्काळी सातारा-सोलापूरमध्ये पावसाचं धुमशान Special Report
सातऱ्यातील दुष्काळी माण-खटाव असो किंवा फलटण.. सोलापूरातील माळशिरस असो की पंढरपूर..पावसाने तुफान बॅटिंग केली. इथल्या दुष्काळी पट्ट्यात अनेक भागात ढगफुटी सदृश्य पाऊस झाला. सोलापूर आणि सातारा जिल्ह्यात पावसानं कसं धुमशान घातलं ते पाहुयात
दुष्काळी सातारा सोलापूरमध्ये पावसाचं धुमशान
दुष्काळी भागात अनेक ठिकाणी ढगफुटी सदृश पाऊस
दुचाकी खांद्यावर घेऊन वाट काढणारा 'बाहुबली'
वैराग परिसरात रस्त्याना ओढ्याचं स्वरूप
पंढरपूरात भीमा नदी पात्रात अडकलेल्या तिघांची सुटका
फलटणमध्ये एनडीआरएफची एक टीम तैनात
कुरभावीत अडकलेल्या नागरिकांना NDRF ची मदत
दुष्काळी भागात ऐन उन्हाळ्यात पावसाचं थैमान
((मोंटाज- सोलापूर, साताऱ्यातील चांगले पावसाचे आज आलेले व्हिज ))
या पावसाने फक्त कोकणालाच झोडपलं असं नाही तर दुष्काळी समजल्या जाणाऱ्या सोलापूर साताऱ्यातही अक्षरश: धुमाकूळ घातला..
माण तालुक्यात एक युवक बाहुबलीप्रमाणे दुचाकी खांद्यावर घेऊन रस्ता पार करताना दिसला
Z:2605SATARABIKE VIS
बाणगंगा नदीच्या प्रवाहात बदल झाला आणि त्यामुळे वाबळे वस्ती परिसरामध्ये दोन्ही बाजूने पूराच्या पाण्याने वेढा घेतला.. परिसरातील वीज वितरण कंपनीचे खांब सुद्धा कोलमडून पडले. 5 फूट रस्ता वाहून गेला..10 एकर शेती पुराच्या पाण्यात वाहून गेली आहे.. 2 विहिरी आणि त्यातील मोटारी देखील वाहून गेल्या. लोकांची शेताच्या शेत या पुरामध्ये वाहून गेले आहेत. जनावरांचे पशुधनाचे मोठे नुकसान या वस्तीवर झालं.
Wkt+चौपाल
बार्शी, वैराग परिसरात रस्त्याना ओढ्याचं स्वरूप आलं.
सोलापूर जिल्ह्यात १७१.४ मि.मी. पाऊस झाला. माळशिरस तालुक्यात 6 नागरिक पुरात अडकले होते, त्यांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले. पंढरपूरात भीमा नदी पात्रात 3 जण अडकले होते, त्यांची सुटका करण्य़ात आली.
वॉकथ्रू + व्हिज
Z:2605SOLAPURBARSHI RAIN
Z:2605SOLAPURppur bhima nadi flood / अपडेट Y:2605ppursadhu vis
फलटणमध्ये 163.5 मि.मी. पाऊस झाला. दुधेबावी गावाशेजारी 30 नागरिक अडकले होते. त्यांना राहण्याची आणि जेवणाची सुविधा पुरविण्यात आली. एनडीआरएफची एक टीम फलटणमध्ये तैनात आहे. फलटण- कांबळेश्वर रस्ता पाण्याखाली दळणवळण पूर्णपणे ठप्प झालं होतं.
चौपाल
Y:2605SATARAatirushati nuksan chupal
मुसळधार पावसामुळे मे महिन्यातच महाबळेश्वर लिंगमळा धबधब्याचं वेगळं रुपंही बघायला मिळालं- Z:2605SATARALINGMALA FOG
बाईट - जयकुमार गोरे
Y:2605YAWATMALJayakumar Gore byte
सोलापुरातील नातेपुते ते बारामती रस्त्यावरील कुरभावीत वाहतूक बंद करावी लागली, नीरा नदीचं पाणी पुलावर आल्याने कुरभावीतील नागरिकांना NDRFच्या टीमने सुरक्षित बाहेर काढलं -
R SOLAPUR SUNIL LIVE 8AM 260525
भीमा आणि नीरा नदीच्या संगमावर पाण्याचे आक्राळविक्राळ रूप पाहायला मिळालं. या पावसामुळे शेतकऱ्यांचं मात्र मोठं नुकसान झालं. चंद्रभागा वाळवंटातील मंदिरे पाण्याखाली, भाविकांनी स्नानासाठी पात्रात उतरू नये असं आवाहन प्रशासनाला करावं लागलं
Z:2605SOLAPURppur chandrabhaga 10am
Z:2605SOLAPURwater vis
अक्कलकोट तालुक्यातील वळसंग गावात सखल भागात शिरले पाणी
Y:2605SOLAPURSOLAPUR RAIN VIS
अकलूजमध्ये पावसानं थैमान घातलं, अकलाई मंदिरात पाणी शिरलं होतं-
R AKLUJ AKLAIDEVI WKT N VIS 260525
पाण्याच्या थेंबासाठी तरसणारी अनेक गावं सोलापूर आणि साताऱ्यात आहेत. या २४-३६ तासात त्यांना भर उन्हाळ्यात पावसाच्या लहरीचं वेगळं रुप पाहायला मिळालं. ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा
All Shows





महत्त्वाच्या बातम्या




























