Sanjay Shirsat Vits Hotel Controversy : आरोपांचा वार, हॉटेलमधून माघार Special Report
छत्रपती संभाजीनगरमधील हॉटेल लिलाव प्रकरण सध्या चर्चेत आहे. संजय राऊत यांनी संजय शिरसाटांवर एकाहून एक गंभीर आरोप केले,एक से एक बढकर दावे केले. संजय शिरसाट यांनी त्यांना जशास तसं उत्तर दिलं पण हॉटेल लिलावाच्या प्रकियेतून माघार सुद्धा घेतली. सत्तेचा गैरवापर केल्याचा आरोप राऊतांनी केला तर मराठी माणसाला मोठं होऊ दिलं नाही असा आरोप शिरसाटांनी राऊतांवर केला. काय घडलं दिवसभरात पाहुयात
शिवसेनेच्या दोन संजयांमध्ये व्हिट्स म्हणजेच वेदांता हॉटेलवरुन सुरु असलेल्या सामन्यानं नवं वळण घेतलं.
हॉटेल विट्सच्या निविदा प्रक्रियेत संजय शिरसाटांना फायदा झाला असा आरोप संजय राऊत आणि अंबादास दानवे यांनी केला होता. त्या निविदा प्रक्रियेतून बाहेर पडण्याचा निर्णय संजय शिरसाटांनी जाहीर केला.
त्यासाठी वेगळी पत्रकार परिषद घेत सर्व आक्षेपांवर स्पष्टीकरण शिरसाटांनी दिलं. मराठी माणसाला मोठं होऊ दिलं नाही असा आरोप करत बिनबुडाचे आरोप करणाऱ्यांनी हॉटेल विकत घेऊन फायदा करुन घ्यावा असं आवाहनही केलं.
संजय राऊतांना चुकीची माहिती पुरवली गेली असा आरोप संजय शिरसाट यांनी केला. मात्र संजय राऊतांनी आपली फटकेबाजी सुरुच ठेवली.शिरसाट यांच्या मुंबईतील ७२ व्या मजल्यावरील घराचा उल्लेखही केला.
छत्रपती संभाजीनगरमधील संजय राऊत यांचे कान आणि डोळे म्हणजे अंबादास दानवे. दानवे म्हणजे संजय शिरसाट यांचे स्थानिक आणि जुने स्पर्धक. व्हिट्स प्रकरणावरुन दानवेंनी आपल्या टीकेला आणखी धार लावली.
विट्स हॉटेलच्या लिलावाचा इतिहास
रमेश हवेली हे विट्स हॉटेल मालक
हवेलींनी धनदा कॉर्पोरेशन स्थापन करुन तिचे शेअर्स विकले
भागधारकांना काही काळ परतावा दिला,पण दिवाळखोरीमुळं तो बंद
न्यायालयात तक्रार केल्यानंतर सरकारकडून हॉटेलची जप्ती
२०१८ मध्ये कोर्टाच्या आदेशानंतर हॉटेलचं ८५.९२ कोटी इतकं मूल्यांकन
बाजारभाव ८५.९२ कोटी असला तरी रिऍलिजिबल किंमत 64.53 कोटी रु.निश्चित
2019 ला पहिला लिलाव, ७६ कोटी किंमत, प्रतिसाद शून्य
2019 ला दुसरा लिलाव, किंमत ६४.५३ कोटी, प्रतिसाद शून्य
२021 ला तिसरा लिलाव किंमत 64.५३ कोटी,प्रतिसाद शून्य
2022 मध्ये चौथा लिलाव किंमत 64.५३ कोटी, प्रतिसाद शून्य
ठेवीदारांच्या विनंती व कोर्ट आदेशानंतर हॉटेलची दोन भागात फोड
हॉटेल आणि हॉटेलसमोरील रिकामी जागा असे दोन भाग
हॉटेल लॉनची किंमत 17.६७ कोटी तर हॉटेलची किंमत 46.८५ कोटी निश्चित
नोव्हेंबर 2022 ला पुन्हा लिलाव पण प्रतिसाद शून्य
डिसेंबर २०२४ मध्ये सहाव्यांदा लिलाव, पण प्रतिसाद नाही
मे 2025 ला सातवा लिलाव, किंमत 64.५३ कोटी,पण हवेलींची कोर्टात धाव
हॉटेलची किंमत कमी आहे हा हवेलींचा आक्षेप कोर्टाने फेटाळला
आठव्या लिलावात तिघांकडून उत्सुकता,निविदाही भरल्या
शिरसाटांच्या सिद्धांत मटेरियलकडून ६४.८३ कोटींची बोली
लक्ष्मी निर्मल हॉलिडे होमकडून 64. ७2 कोटींची बोली
कल्याण टोल इन्फ्रास्ट्रक्चर लि.कडून ६4.६२ कोटींची बोली
बोलीची २५ टक्के रक्कम २१ मे तर ७५ टक्के रक्कम पुढील ९० दिवसांत भरण्याची अट
सगळे कार्यक्रम






























