Pawar vs Shinde Special Report :अजितदादांचे उमेदवार पाडण्यासाठी एकनाथ भाईंचं बजेट?राऊतांचा दावा काय?
Sanjay Raut : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लोकसभा निवडणुकीत पैशाचा अफाट वापर केला. प्रत्येक मतदारसंघात त्यांनी किमान 25 ते 30 कोटी रुपये वाटले. पुन्हा अनेक उमेदवार पाडण्यासाठी वेगळे बजेट. अजित पवार यांचा एकही उमेदवार निवडून येऊ नये यासाठी शिंदे व त्यांच्या यंत्रणेने खास प्रयत्न केल्याचा गंभीर आरोप शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला आहे.
महाराष्ट्राच्या राजकारणात आलेल्या या समृद्धीने अनेकांचे डोळे दिपले
राऊत यांनी सामनामधील रोखठोक सदरात शिंदेंनी अजितदादांविरोधात कारस्थाने केल्याचा आरोप केला आहे. राऊत यांनी म्हटले आहे की, महाराष्ट्राच्या राजकारणात आलेल्या या समृद्धीने अनेकांचे डोळे दिपले. विचारांवर चालणारा महाराष्ट्र निवडणूक पैशांच्या धुरळ्यावर चालला. लोकांनी पैसे घेतले भ्रष्टाचारातून निर्माण झालेले सरकारने शेवटी जनतेला भ्रष्ट केले, असा आरोप राऊत यांनी रोखठोक सदरातून केला आहे.
भ्रष्टाचारातून निर्माण झालेल्या सरकारने शेवटी जनतेलाही भ्रष्ट केले
राऊत यांनी म्हटले आहे की, विचारांवर चालणारा महाराष्ट्र या निवडणुकीत पैशांच्या धुळ्यावर चालला लोकांनी पैसे घेतले भ्रष्टाचारातून निर्माण झालेल्या सरकारने शेवटी जनतेलाही भ्रष्ट केले. त्याचे आज कोणालाही काही वाटेनासे झाले. मोदी शहांच्या राजकारणाने महाराष्ट्राचे केलेले हे अध:पतन. तरीही महाराष्ट्र विकला जाणार नाही. किमान 32 जागांवर मोदी शहा मित्रमंडळाचा पराभव होईल. महाविकास आघाडीने झंझावात उभा केला. त्यामुळे मोदी फडणवीस शिंदे हे उडून गेले. अमित शहांची दखलही महाराष्ट्राने घेतली नाही. महाराष्ट्रात पैशांचे राज्य या लोकांनी निर्माण केले. तोच महाराष्ट्र दिल्लीतील पैशांचे राज्य उखडून फेकेल. बदल नक्की होतोयय. मोदींच्या बोलण्यातला, वागण्यातला जोर ओसरला हे दिसत आहे. 2019 ची निवडणूक पुलवामा हत्याकांडातील जवानांच्या बलिदानामुळे मोदींनी जिंकली. 2024 ची निवडणूक मोदींच्या त्याच जवानांच्या शाप तळतळाट यामुळे हरत आहेत. जवानांचे आत्मे भटकत होते, 4 जूनला त्यांना मोक्ष प्राप्ती होईल.