Sanjay Raut Book : राऊतांचे लाडके आणि दोडके; फडणवीस, शिंदे, राज यांना पत्रातून काय म्हणाले राऊत? Special Report
Sanjay Raut Book : राऊतांचे लाडके आणि दोडके; फडणवीस, शिंदे, राज यांना पत्रातून काय म्हणाले राऊत?
ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या नरकातला स्वर्ग या पुस्तकाची चांगलीच चर्चा झाली. आता संजय राऊतांनी हे पुस्तक तीन मोठ्या नेत्यांना भेट म्हणून दिलंय. ते नेते आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे. पण पुस्तक देताना त्यांनी लिहिलेले शब्दही उत्सुकतेचा विषय बनलाय... त्यावरून राऊतांचे लाडके कोण आणि दोडके कोण याचीही चर्चा रंगलीये... पाहूयात...ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांचं नुकतंच प्रकाशित झालेलं नरकातला स्वर्ग हे पुस्तक चर्चेत आहे...
त्या पुस्तकाची जितकी चर्चा झाली त्याहून अधिक चर्चा संजय राऊतांनी पुस्तक कुणाकुणाला भेट दिलं याची होतेय.
राऊतांनी ज्यांना पुस्तक भेट दिलं त्या यादीत नावं आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज ठाकरे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची...
राऊतांनी पुस्तक देताना लिहिलेले शब्दही उत्सुकतेचा विषय बनलेत.
त्यावरून कळतंय की राऊतांचे लाडके कोण आहेत आणि दोडके कोण आहेत...
GFX IN
फडणवीसांसाठी त्यांनी लिहिलंय प्रिय देवेंद्रजी, राज ठाकरेंसाठी प्रिय श्री राज...पण एकनाथ शिंदेंसाठी मात्र केवळ श्री असं लिहिलंय...
GFX OUT
या तिघांनीही हे पुस्तक वाचलं पाहिजे, असं आवाहन संजय राऊतांनी केलंय...
या तिघांना पुस्तकासोबतच राऊतांनी तिन्ही नेत्यांना पत्रही पाठवलंय...पत्रात त्यांनी पुस्तक पाठवण्याबद्दलची आपली भूमिका मांडलीय...
देवेंद्र फडणवीसांठीच्या पत्रात काय? - H
- देशातील, राज्यातील जुलमी शासनव्यवस्थेनं खोट्या प्रकरणात मला १०० दिवसांसाठी तुरुंगात पाठवलं
- त्यात माझी आणि माझ्या कुटुंबाची ससेहोलपट झाली
- लोकशाही विरोधकांचा आवाज दडपण्यासाठी सरकारनं मुस्कटदाबी केली,
- तुरुंगातील विदारक अनुभव, माझ्या गजाआडील चिंतनावर हे पुस्तक आहे
राज ठाकरेंसाठीच्या पत्रात काय?
- राज्यव्यवस्थेने मला खोट्या प्रकरणात १०० दिवस पाठवलं
- लोकशाहीत विरोधकांचा आवाज दडपण्यासाठी सरकारनं हे कृत्य केलं
- तुरुंगातील अनुभवाचं कथन, माझ्या गजाआडील चिंतनातून हे पुस्तक निर्माण झालं
- वाचनाची आवड असल्यामुळे तुम्हाला हे पुस्तक पाठवलंय
एकनाथ शिंदेसाठीच्या पत्रात काय? - H
- ईडीसारख्या तपास यंत्रणांचा जुलूम सहन करून संघर्ष करून मी संकटातून बाहेर पडलो
- या प्रवासातील अनेक घटनांचे आपण एक साक्षीदार नक्कीच आहात
- भाजपपुरस्कृत तपास यंत्रणांना भीक न घालता स्वाभिमान टिकवता येतो, हे सांगण्याचा माझा प्रयत्न आहे
बालसाहित्य वाचत नाही, अशी खिल्ली फडणवीसांना राऊतांच्या पुस्तकाची उडवली होती...
आता ते राऊतांनी पाठवलेलं पुस्तक वाचणार का?
राज ठाकरे पुस्तक वाचून अभिप्राय कळवणार का?
आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे एकनाथ शिंदे हे पुस्तक वाचून काय प्रतिक्रिया देणार हे पाहणं उत्सुकतेचं आहे...
All Shows

































