Sanjay Raut : संजय राऊतांचं पुस्तक... गौप्यस्फोट, खळबळजनक दावे आणि राजकीय बॉम्बगोळे Special Report
नरकातला स्वर्ग....ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते संजय राऊत यांच्या उद्या प्रकाशित होणाऱ्या पुस्तकाचं हे शीर्षक. संजय राऊतांना झालेली अटक, त्यांचे तुरुंगातले १०० दिवस, नंतर झालेला जामीन आणि सुटका असा घटनाक्रम आपल्या साऱ्यांनाच ज्ञात आहे. या अटकेतल्या १०० दिवसांची कहाणी राऊतांनी पुस्तकरुपात शब्दबद्ध केलीय. ज्यात अनेक गौप्यस्फोट, खळबळजनक दावे आणि राजकीय बॉम्बगोळे आहेत. पाहूया याचसंदर्भातला रिपोर्ट.
नरकातला स्वर्ग...
पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी आर्थर कारागृहात असताना, संजय राऊतांच्या लेखणीनं जन्माला घातलेलं पुस्तक...
राऊतांनी कारागृहाच्या चार भिंतीआड घालवलेले १०० दिवस, राजकीय दाव्याच्या कहाण्या पानावर उतरवण्यात घालवले...
आता राऊतांचे दावे किती खरे किती खोटे हा संशोधनाचा विषय आहे...
मात्र पुस्तकातल्या राजा का संदेश साफ है, या प्रकरणात संजय राऊतांनी उपकारांच्या कहाण्या सांगितल्यात...
गुजरात दंगलीप्रकरणी तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्या मागे चौकश्यांचा ससेमिरा लागला होता..
यावेळी बाळासाहेब ठाकरेंनी अमित शाहांसाठी नैतिकतेची चौकट ओलांडून केलेल्या मदतीबाबत राऊतांनी खळबळजनक दावा केलाय.
All Shows

































