Raj Thackeray in Action Special Report : राज ठाकरेंची तोफ कुणावर धडाडणार? ABP Majha
मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे हिप बोनच्या शस्त्रक्रियेतून सावरल्यानंतर पुन्हा अॅक्टिव्ह मोडमध्ये पाहायला मिळणार आहेत. तब्बल दोन महिन्यांच्या विश्रांतीनंतर राज ठाकरे हे मनसे पदाधिकाऱ्यांचा मेळावा घेणार आहेत. मनसे अध्यक्षांनी २२ ऑगस्टला पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली आहे. त्यानंतर ते पत्रकार परिषदही घेणार आहेत. तसंच मनसेच्या वतीनं २३ ऑगस्टला राज्यभरातल्या कार्यकर्त्यांचा मेळावा घेँण्यात आला आहे. या मेळाव्याला राज ठाकरे संबोधित करणार आहेत. त्यांच्या भूमिकेकडे राजकीय निरीक्षकांचं लक्ष राहिल. कारण गेल्या काही दिवसांत राज ठाकरे यांची भाजप नेत्यांसोबत जवळीक वाढली होती. पण शिवसेनेतल्या बंडानंतर शिंदे गटाची भाजपला साथ मिळाली आहे. त्यामुळं मुंबई आणि ठाण्यासह आसपासच्या महापालिकेत भाजपचं आव्हान मजबूत झालं आहे.
All Shows

































