Pune Bhondu Baba : भोंदूबाबाचे चाळे, कारनामे काळे Special Report
आजच्या विज्ञान तंत्रज्ञानाच्या युगात भोंदूबांवर विश्वास ठेवणारे भक्त लोक कमी नाहीत....पुण्यातल्या अशाच एका भोंदूबाबाचा एक विकृत कारनामा समोर आलाय. भक्तांच्या मोबाईलमध्ये छुप्या पद्धतीने अॅप डाउनलोड करून त्यांना अश्लील कृत्य करायला लावणाऱ्या बाबाला पोलिसांनी बेड्या ठोकल्यायत... पण हा बाबा नेमका कोण होता? त्यानं नेमका काय प्रताप केलाय? आणि त्याचा भांडाफोड कसा झाला? पाहूयात आमचे प्रतिनिधी मंदार गोंजारींचा हा खास रिपोर्ट......
भक्ताला आंघोळ घालणारा बाबा...
((visuals - त्या व्यक्तीला ब्लर करा))
महिला भक्तांसोबत नाचणारा बाबा...
((visuals- महिलेला ब्लर करा ))
आणि भक्तांच्या मोबाईलमधील डेटा चोरणारा हा बाबा...
((मोबाईलमध्ये बघताना बाबाचा फोटो))
पुरुष भक्तांची मालिश करणारा
त्यांना आंघोळ घालणाऱ्या या बाबाचं प्रस्थ
गेल्या काही वर्षात पुणे आणि आसपासच्या परिसरात चांगलंच वाढलं होतं...
सोशल मीडियातही लाखो फॉलोअर्स
आणि बाबाच्या मठातही भक्तांची तोबा गर्दी...
मिड पीटीसी - मंदार गोंजारी
((प्रसादचा वडील भीमराव दातीरने दिव्य साक्षात्कार झाल्याचा दावा करत हा मठ काही वर्षांपूर्वी सुरु केला. पुढे सी ए पर्यंतच शिक्षण झाल्याचा दावा करणारा प्रसादने २०२२ मध्ये स्वतः या मठात बाबा बनण्याचा निर्णय घेतला . मात्र त्याचा हा निर्णय भक्तांकडून पैसे उकळण्याबरोबरच त्यांच्याशी समलैंगिक संबंध प्रस्थापित करता यावेत यासाठी होता))
पण हा भोंदू प्रसाद बाबा त्याच्या मठात आलेल्या भक्तांचे मोबाईल फोन मागून घ्यायचा
आणि त्यानंतर तो काय करायचा ते ऐका....
बाईट - बापू बांगर, पोलीस उपयुक्त
((ग्रहदोष असल्याने मोबाईलमध्ये कंपास ऐप डाउनलोड करावं लागेल असं कारण तो द्यायचा . मात्र ते एप डाउनलोड करताना तो एअर ड्रॉइड कीड हे आणखी एक एप चोरून डाउनलोड करायचा. या एपमुळे भक्ताच्या संपूर्ण मोबाईलचा एक्सेस प्रसाद बाबाला मिळायचाच . भक्ताच्या त मोबाईलमधील कॅमेरातून दिसणारी सगळी माहिती तो गोळा करायचा आणि त्याचा उपयोग भक्ताला प्रभावित करण्यासाठी करायचा))
त्यामुळे आपण कुठे गेलो
कोणत्या रंगाचे कपडे घातले
ही सगळी भक्तांची माहिती बाबाला मिळायची
आणि ही आंधळी भक्तमंडळी बाबाला दिव्य साक्षात्कार झाल्याचं समजून
त्याच्या भक्तीत तल्लीन व्हायची
मिड पीटीसी - मंदार गोंजारी
((त्यानंतर प्रसाद बाबा विश्वास संपादन केलेल्या तरुण भक्तांना सलग दोन दिवस केवळ तीन तास झोप घेण्याचा सल्ला द्यायचा . त्यानंतर त्या भक्ताला या मठात बोलावून पुढच्या अघोरी विद्येच्या क्रिया करण्यासाठी सर्व कपडे काढून फक्त शाल पांघरून झोपायला सांगायचा . सलग दोन दिवस झोप मिळाल्याने तो भक्त झोपी गेला कि प्रसाद बाबा त्याच्यासोबत लैंगिक चाळे सुरु करायचा आणि तो भक्त जागा झाल्यावर तुझ्या सगळ्या समस्या माझ्याकडे घेतो आहे असं सांगत त्या भक्ताला लैंगिक संबंध ठेवायला भाग पडायचा))
पुणे जिल्ह्यातील देहू रोड भागातल्या
एका ३९ वर्षांच्या बांधकाम व्यवसायिकाचं
या भोंदू बाबानं असंच लैंगिक शोषण केल...
असाच प्रकार व्यवसायिकाच्या मेहुण्यासोबतही करण्याचा प्रयत्न केला
मात्र बाबाच्या भोंदूगिरीचा महिमा व्यावसायिकाच्या मेहुण्याच्या लक्षात आला
आणि या बाबाचं बिंग फुटलं.....
त्या दोघांनीही बाबाची तक्रार केली आणि पोलिसांनी बाबाला बेड्या ठोकल्या
बाईट - बापू बांगर, पोलीस उपयुक्त
((अटकेची माहिती))
या प्रसाद बाबाचे महिला भक्तांसोबत नाचताना...
मठात संवाद साधतानाचे अनेक व्हिडीओ त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटला दिसतात
ही संख्या बरीच मोठी असण्याची शक्यता आहे
त्यामुळे पोलिसांनी अशा पीडितांना समोर येऊन
तक्रार दाखल करण्याचं आवाहन केलंय....
एन्ड पीटीसी - मंदार गोंजारी, प्रतिनिधी
((कौटुंबिक समस्यांनी ग्रासलेल्या भक्तांचं आधीचे भोंदू बाबा अंगाऱ्या धूपाऱ्यानी फसवायचे . प्रसाद बाबा हा आधुनिक काळातील भोंदू आहे म्हणून त्याने भक्तांना फसवण्यासाठी मोबाईल एपचा आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग केला . पण आश्चर्य वाटतं ते त्याच्या नदी लागणाऱ्या भक्तांचं . शिकले - सवरलेले लोक जोपर्यंत त्यांच्या समस्यांचे उत्तर अंधश्रद्धे मध्ये शोधात राहतील तोपर्यंत प्रसाद बाबा सारखे भोंदू तयार होत राहतील . मंदार गोंजारी , पुणे))
All Shows

































