Climate Change Special Report : आखाती देशातल्या वाळवंटात महापूर कशाचा इशारा? ABP Majha
क्लायमेट चेंज.. हा शब्द तुम्ही आम्ही अनेकवेळा ऐकलाय. नेहमी पेक्षा जास्तच तापमान वाढलं किंवा अपेक्षेपेक्षा जास्त पाऊस झाला की क्लायमेट चेंजवर जोरदार चर्चा होतात. खरंतर, पृथ्वीच्या तापमानात वाढ होतेय हे तर जगमान्य आहे. पण, त्यामुळे काय होत असेल.. यापेक्षा आता जगात काय सुरु आहे हे महत्वाचं आहे. आता हे आम्ही का सांगतोय तर त्याचं उत्तर आहे.. गेल्या २० दिवसातल्या घडामोडी.. जगाच्या पाठीवर ज्या देशांमध्ये आज घडीला थंड वातावरण असतं, त्या देशांमध्ये विक्रमी तापमान वाढ झालीय. आणि त्याच्या उलट, ज्या देशांमध्ये आज घडीला चांगलंच तापमान असायला हवं होतं, त्या देशांमध्ये विक्रमी पाऊस सुरु आहे. या घटना म्हणजेच हवामान बदलाचा रेड अलर्ट आहे.
All Shows




























