Heeraben Modi Death Special Report : PM Modi यांच्या आई आणि जीवनातील संघर्ष
Heeraben Modi Demise: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांच्या आई हिराबेन यांनी जीवनात संघर्ष केला आहे. हिराबेन या अतिशय शिस्तबद्ध होती. पंतप्रधान मोदी आजही आईकडून शिकण्याचा प्रयत्न करतात. हिराबेन यांचा जन्म पालनपूरमध्ये झाला, लग्नानंतर त्या वडनगरला शिफ्ट झाल्या. हिराबेन यांचे लग्न झाले तेव्हा त्या अवघ्या 15 ते 16 वर्षाच्या होत्या. घरची आर्थिक व कौटुंबिक परिस्थिती कमकुवत असल्याने त्यांना शिक्षणाची संधी मिळाली नाही. पण त्यांनी आपल्या मुलांना शिक्षण देण्यासाठी इतरांच्या घरी काम करण्यासही होकार दिला. फी भरण्यासाठी त्यांनी कधीही कोणाकडून पैसे घेतले नाहीत. हिराबांची इच्छा होती की आपल्या सर्व मुलांनी शिक्षण घ्यावे.
All Shows
































