Parbhani Protest : तोडफोड, मोर्चे, आंदोलनं आणि ठिय्या... परभणी का पेटलं? Special Report
वाहनांची तोडफोड...
जिल्हाधिकारी कार्यालयातही तोडफोड...
दिवसभर मोर्चे, आंदोलनं आणि ठिय्या...
ही तणावाची परिस्थिती निर्माण झालीये
परभणीत...
पण या आंदोलनाला हिंसक वळण लागलं...
दगडफेक झाली... वाहनांची तोडफोड करण्यात आली
काल सुरु झालेलं हे आंदोलनाचं लोण
दुसऱ्या दिवशी आणखी पेटलं...
सकाळपासून शांततेत सुरु असलेलं आंदोलन
दुपारी एकच्या सुमारास भडकलं...
तरुणांचा एक गट लाठ्या-काठ्या आणि दगड घेऊन शहरात घुसला...
आणि या जमावानं बंद दुकानांवर हल्ला चढवला...
इतकंच नव्हे तर पोलिसांवरही दगडफेक झाली...
पोलिसांनी शांततेचं आवाहन केलं...
आणि परिस्थिती थोडीफार नियंत्रणात आली...
त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीची बैठक घेतली...
या बैठकीत जमावबंदीचा आदेश काढण्यात आला
पण याचदरम्यान महिलांचा एक गट थेट जिल्हाधिकारी कार्यालयात घुसला
आणि तिथेही तोडफोड झाली...
परभणीच्या या राड्यानंतर
आरोपांच्या फैरीही सुरु झाल्यायत...