Pak Spy Jyoti Malhotra : पाच गद्दार, एक सूत्रधार, गद्दारांचा कबूलीनाम्यात काय काय?
Pak Spy Jyoti Malhotra : पाच गद्दार, एक सूत्रधार, गद्दारांचा कबूलीनाम्यात काय काय?
भारत आणि पाकिस्तानमधील (India vs Pakistan War) संबंध ताणले गेले असतानाच आता यूट्यूबरच्या मुखवट्या पलीकडे असलेल्या हेरगिरांचा खरा चेहरा समोर येत आहे. हेरगिरीच्या आरोपाखाली युट्यूबर ज्योती मल्होत्रा (Jyoti Malhotra) हिला अटक करण्यात आली आहे. ज्योती मल्होत्रा पाकच्या आयएसआयच्या संपर्कात असल्याचा संशय व्यक्त केलाय जात आहे. दरम्यान, ज्योती मल्होत्राच्या फोन आणि लॅपटॉपची तपासणी करण्यात आली. यावेळी ज्योतीच्या फोनमध्ये अनेक पाकिस्तानी नंबर सापडल्याचे समोर आले आहे. त्यामुळे पाकिस्तानसाठी ज्योती मल्होत्रा ॲसेट (खास व्यक्ती) बनली होती, असं हळूहळू समोर येतंय.
पाकिस्तानी उच्चायुक्तालयात काम करणारा अधिकारी दानिशनं ज्योतीची आणखी दोघांशी ओळख करून दिली. या तिघांशीही ज्योतीचे चांगले संबंध होते. पाकिस्तानी व्हिसाच्या प्रयत्नात असणाऱ्यांवर आयएसआयची नजर असते. व्हिसा मिळवतानाच ज्योतीचा आयएसआयशी संबंध आल्याची माहिती आहे. ज्योती चार वेळा पाकिस्तानमध्ये गेली यावेळी ती कोणाकोणाला भेटली, एसआयला गोपनीय माहिती पुरवण्यामध्ये तिच्यासोबत आणखी कोण कोण सामील आहे ? यासंदर्भात तिला विचारणा करण्यात येतेय. त्यामुळे या चौकशीदरम्यान आणखी काय नवीन खुलासे समोर येतात हे पाहणं महत्त्वाचं आहे.
All Shows

































