Nilesh Chavan : निलेश चव्हाणच्या पिस्तुलाचं मंत्रालय कनेक्शन? निलेश चव्हाणचा आका कोण? Special Report
सर्वसामान्यांना अनेक कामांसाठी सरकारी कार्यालयात, मंत्रालयात अनेक खेपा माराव्या लागलात. मात्र एका गुन्हेगारी पार्श्वभूमी असणाऱ्याला शस्त्रपरवाना मात्र सहज कसा मिळतो असा प्रश्न अनेकांना पडलाय. वैष्णवी हगवणे प्रकरणातील संशयित निलेश चव्हाणला अनेक गुन्हे दाखल असताना पिस्तुलाचा परवाना मिळालाय. तोही मंत्रालयातील कनेक्शनमुळे... निलेश चव्हाणच्या पिस्तुलाचं हे मंत्रालय कनेक्शन नेमकं काय आहे? पाहूयात याविषयीचा हा खास रिपोर्ट...
वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात
अटकेत असलेला हा संशयित आरोपी निलेश चव्हाण...
याच निलेशनं वैष्णवीच्या बाळ त्याच्या कस्टडीत असताना
बाळाचा ताबा मागण्यासाठी गेलेेल्या कस्पटे कुटुंबाला
पिस्तुलाचा धाक दाखवत हुसकावून लावलं होतं...
पण गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या निलेशकडे पिस्तुल नेमकं आलं कसं?
निलेश चव्हाणवर कोणते गुन्हे?
२००९ मध्ये पुण्याच्या
वारजे पोलिस ठाण्यात
हाणामारीच्या प्रकरणात
अदखल पात्र गुन्हा दाखल
२०२१ मध्ये
हिंजवडी पोलीस ठाण्यात
ड्रंक एन्ड ड्राईव्हप्रकरणी
गुन्हा दाखल
मे २०२२ मध्ये
स्पाय कॅमेरा लावून
आक्षेपार्ह शूटिंग केल्याचा
निलेशच्या पत्नीचा आरोप
पत्नीच्या तक्रारीनंतर
वारजे पोलीस ठाण्यात
गुन्हा दाखल
All Shows

































