(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Navi Mumbai : आरोपीनं भेदली अभेद्य भिंत...तळोजा कारागृहातून पहिल्यांदाच पळाला आरोपी Special Report
तळोजा जेलची सुरक्षा वा-यावर असल्याचे दिसून आले असून जेलमधील कैद्याने थेट भिंतीवरून उडी मारून पलायन केल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. भांडूप पोलीस ठाण्यातील हत्येमझील आरोपी संजय यादव हा तळोजा जेलमध्ये 2018 पासून होता. त्याच्या बरोबर साथीदारही तुरूंगात आहे. काल दुपारी १ च्या सुमारास आरोपी संजय यादव आणि त्याचा मित्र मेडीसिन घेण्यासाठी पॅरेकेट मधून बाहेर आले होते. जेलमधील मेडिसिन विभागात न जाता आतील पोलीसांची सुरक्षा भेदून ते थेट बाहेरील भिंती पर्यंत पोचले. विशेष म्हणजे या ठिकाणी असलेल्या मचानावर देखील पोलीस गार्ड नसल्याने याचा फायदा घेत भिंतीवर चढून आरोपीने बाहेर उडी मारली. 25 फुट उंच असलेल्या भिंतीवरून आरोपी संजय यादव याने उडी घेतली. मात्र त्याच्या साथीदाराची वरून उडी मारण्याची हिंमत न झाल्याने त्याला पळून जाण्यात यश आले नाही. डोंगराच्या बाजूला उडी मारून झाडातून गायब होण्यात संजय यादव याला यश आले आहे. दिवसा कैदी पळून जात असतील तर सुरक्षेबाबत संशय व्यक्त होत आहे. या प्रकरणी खारघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.