Nagpur Rain Special Report : 6 तासांच्या पावसात नागपूरची दाणादाण
Nagpur Rain Special Report : 6 तासांच्या पावसात नागपूरची दाणादाण हेडगेवार चौक... पडोळे हॉस्पिटल चौक...शंकर नगर चौक .. खरबी... वाठोडा...भांडेवाडी , नरसाळा ... पिपळा ... बेसा ... नागपूर शहरातील सर्वच वस्त्यांमध्ये एकच स्थिती... ड्रेनेज सिस्टीम कोलमडल्यानं पावसाचं पाणी रस्त्यानं धावत होतं... लहान मुलांसाठी हा विरुंगळा म्हणून आनंदाचा क्षण होता ... मात्र अनेकांच्या आयुष्य या पावसाने चिखलाने माखले ... लोकांच्या घरात पाणी शिरले, वस्तूंची, धान्याची नासधूस झाली.. इलेकट्रोनिक उपकरणांची नासाडी झाली... सहा तासात झालेल्या 217 मिलीमीटर पावसाने नागपूर शहराची संपूर्ण ड्रेनेज सिस्टीम कोलमोडून टाकली वर शहराच्या मुख्य रस्त्याने वाहायला सुरुवात केली ... फक्त नागरिक वस्त्यांचा नाही तर सरकारनं उभारलेल्या प्रधानमंत्री आवास योजनेच्या वसाहतीमध्ये पाणी शिरले, पोलीस ठाण्यांमध्ये पाणी शिरले.. पुराच्या पाण्याने गरीब असो की श्रीमंत कोणालाही सोडले नाही. पिपळा, बहादुरा, खरबी या नव्याने विकसित होणाऱ्या भागात पूर परिस्थिती निर्माण झाली. याला पूर्णपणे प्रशासनाचा अनियोजित विकास जबाबदार असल्याचा नागपूरकरांचा आरोप आहे. पिपळा भागातील कलावती नगर मध्ये 15 नागरिक अडकले होते त्यांना एसडीआरएफ च्या पथकाने बाहेर काढलं. वेणा नदीत पाच मजूर अडकले त्यांना देखील बाहेर काढण्यात यश आले. मात्र प्रत्येक वेळी एका मोठ्या पावसानं सगळीच नासधूस होते, यावर उपाय काय हा प्रश्न आहे...
तुषार कोहळे, एबीपी माझा, नागपूर.