Mansoon Maharashtra : मान्सूनचा सुपरफास्ट प्रवास, मोडला इतिहास Special Report
४ महिने राहणारा पाहुणा दरवर्षीप्रमाणे ठरलेल्या वेळी येणार म्हणून सगळे जण निवांत होते, आपापलं काम वेळेत पूर्ण करत होते... पाहुण्याने मात्र सगळ्यांची परीक्षा घ्यायचं ठरवलं.. तो १०-१५ दिवस आधीच येऊन धडकला. मग काय मुंबई ते माळशिरस फलटण ते श्रीवर्धन सगळ्यांची त्रेधातिरपीट उडाली. तो असा बरसला की २६ जुलै आहे की २६ मे हे असा प्रश्न पडावा. महाराष्ट्रात आणि मुंबईत मान्सून वेळेआधी का धडकला आणि इतका का बरसला ते पाहुयात
((मोंटाज- मुंबई पावसाचे चांगले व्हिज, शक्यतो आऊटडोअर वापरणे, गेटवे, समुद्र वगैरे))
उन्हाचा पारा, घामाच्या धारांनी मुंबईकर त्रस्त झालेला असताना..
कधी एकदा मे महिना संपतो, कधी १० जून उजाडतो आणि पावसाला सुरुवात होते याकडे डोळे लावून बसलेला असताना मुंबईकराला पावसाने अचानक गाठले.
नेहेमीच्या वेळेच्या १२ दिवस आधी महाराष्ट्रात आणि १६ दिवस आधी मुंबईत मान्सूनने धडक मारली.
२६ जुलै आहे की २६ मे हे असा प्रश्न मुंबईकराला पडला असेल इतका मुसळधार पाऊस मुंबई परिसरात बरसला.
मान्सूनने महाराष्ट्रात आणि मुंबईत दाखल होण्याचा विक्रम मोडला
बाईट - शुभांगी भुते
((R MUM IMD SHUBHANGI BHUTE TT 260525 शुभांगी भुते, प्रमुख, मुंबई प्रादेशिक हवामान केंद्र 121 ))
GFX IN
हेडर- वेळेआधी आला, तुफान बरसला
मुंबईत तब्बल ५४ वर्षांनी मान्सून मे महिन्यात धडकला
याआधी १९५६, १९६२ आणि १९७१ मध्ये २९ मे रोजी मुंबईत दाखल झाला होता
यंदा मान्सून नेहेमीच्या वेळेच्या १६ दिवस आधीच मुंबईत दाखल झाला आहे
मुंबईत मे महिन्यात १०७ वर्षांतला विक्रमी पाऊस पडला
महाराष्ट्रात ७ जूनपर्यंत दाखल होणारा मान्सून यावेळी १२-१४ दिवस आधीच धडकला
GFX OUT
बाईट -
R PUNE IMD TT LIVE 260525 - हवामान शास्त्रज्ञ- एस. डी सानप
((महाराष्ट्रात लवकर येण्याची कारणं सांगितली आहेत, बहुतेक लास्ट बटवन प्रश्नाचं उत्तर))
यावेळी केरळमध्ये मान्सून नेहेमीच्या वेळेच्या दोन दिवस आधीच धडकला होता. काही वेळा महाराष्ट्रापर्यंतचा त्याचा प्रवास धीम्या गतीने होतो. यंदा मात्र न रेेंगाळता त्याने थेट टॉप गियर टाकला.
बाईट- मयुरेश प्रभुणे
Z:2605punemayuresh prabhune dlive
पाऊस जोरदार बरसला असला तरी शेतकऱ्यांनी पेरण्यांची घाई करु नये असं आवाहन कृषी विभागानं केलं आहे.
R PUNE KRUSHI SANCHALAK BYTE 260525 पुणे - र.शा. नाईकवाडी, कृषी संचालक बाईट
यावेळी पावसाळ्यात पाऊसमान सरासरीपेक्षा जास्त राहणार आहे असा अंदाज हवामान विभागानं आधीच दिला आहे. त्याची झलक पावसाळा सुरु व्हायच्या आधी म्हणजे मे महिन्यातच पाहायला मिळाली. महाराष्ट्रात सर्वदूर मान्सूनची आगेकूच कायम राहिल अशी आशा.
ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा
All Shows





महत्त्वाच्या बातम्या



























