Maharshtra Maratha MP : जरांगेंच्या आंदोलनाचा इम्पॅक्ट,किती मराठा खासदार निवडून आले?Special Report
लोकसभा निवडणुकीच्या निकालात महाराष्ट्रातून सर्वाधिक खासदार मराठा समाजाचे निवडून गेलेत. त्यामुळे नव्या चर्चांना उधाण आलंय. एकीककडे मराठा खासदारांनी आरक्षणाचा विषय तडीस न्यावा अशी मागणी होतेय. तर, दुसरीकडे खासदारांच्या जातनिहाय आकड्यांवरून नवी चर्चा सुरू झालीय. पाहूयात... नेमकं काय झालंय...
महाराष्ट्रात पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीतून खासदार म्हणून सर्वाधिक वाटा मराठा समाजाला मिळाला आहे का!!! राज्यातील निवडून आलेल्या 48 खासदारांची यादी तपासली तर त्यामध्ये तब्बल 26 मराठा खासदारांचा समावेश आहे.... तर फक्त 9 खासदार हे ओबीसी समाजातील आहेत... 6 खासदार अनुसूचित जातीचे, 4 खासदार अनुसूचित जमातींचे, तर 3 खासदार खुल्या वर्गातील असल्याचे दिसून येत आहे... त्यामुळे राज्यातील गेल्या काही महिन्यातील राजकीय वातावरण, मराठा आरक्षणासाठीचा आंदोलन, आणि त्यामुळे झालेला मराठा मतांचा ध्रुवीकरण याचा हा परिणाम आहे का, असा प्रश्न उपस्थित होत आहे...