Thackeray Government vs Kirit Somaiya : 'मविआ'चे मंत्री सोमय्यांच्या रडारवर Special Report
मुंबई : महाविकास आघाडी सरकारमधील मंत्र्यांवर आरोपांची मालिका सुरु करणाऱ्या माजी खासदार किरीट सोमय्या यांना कोल्हापूर दौऱ्यावर पोलिसांना बंदी घातली आहे. यामुळे किरीट सोमय्या यांनी महाविकास आघाडी सरकारवर पुन्हा एकदा गंभीर आरोप केले आहेत. हसन मुश्रीफ यांचा घोटाळा उघड केल्यानंतर आता आपण विदर्भातील नेत्याचा घोटाळा बाहेर काढणार होतो. शरद पवार यांना हे कळल्यामुळेच त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सांगून माझा कोल्हापूर दौरा प्रतिबंधित केला असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
किरीट सोमय्या यांच्या मुंबईतील घराबाहेर मोठ्या प्रमाणात पोलीस तैनात करण्यात आले आहेत. त्यामुळे हसन मुश्रीफ यांचा घोटाळा बाहेर येऊ नये म्हणून गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी मला अटक करण्याचे आदेश दिले असल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे.
All Shows

































