Jitendra Awhad : आंदोलन, माफी, आव्हाड आणि गुन्हा Special Report
मनुस्मृतीच्या श्लोकांचा शालेय अभ्यासक्रमात समावेश करण्याला जितेंद्र आव्हाडांनी विरोध केला... याविरोधात आज महाडमधील चवदार तळं इथं आव्हाडांनी आंदोलन केलं..आंदोलनादरम्यान जितेंद्र आव्हाडांच्या हातून एक मोठी चूक घडली.. आणि हे आंदोलन आता आव्हाडांच्या अंगलट आलाय.. काय होती ती चूक पाहुयात एक रिपोर्ट
मनुस्मृतीच्या प्रती जाळण्यासाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी...
महाडमधलं ऐतिहासिक तळं गाठलं..
मनुस्मृतीच्या श्लोकांचा शालेय अभ्यासक्रमात समावेश नको म्हणून त्यांनी हा आक्रमक पवित्रा घेतला..
मात्र या आंदोलनादरम्यान जितेंद्र आव्हाडांच्या हातून एक मोठी चूक घडली..
त्यांच्या हातून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो फाडला गेला..
आव्हाडांच्या हातून घडलेल्या या कृत्याविरोधात नाशिक, मुंबई, ठाण्यात शिंदेंच्या शिवसेनेने आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीने आंदोलन केलंय.
झाल्या प्रकाराबद्दल आव्हाडांनी माफी मागितली आहे..
तर भाजपनं गुरूवारी राज्यभर आंदोलनाचा इशारा दिलाय.