Iran Attacks Israel Special Report : इराण आणि इस्रायल युद्धाचे आर्थिक क्षेत्रावर कोणता परिणाम?
इराण आणि इस्रायल युद्धाचा मोठा आगडोंब उसळलाय... इराणने इस्रायलवर शेकडो मिसाईल डागली आहेत त्यामुळे अनेक सैनिक ठार झालेत तर निष्पाप नागरिकांचाही बळी गेलाय... आता या युद्धाचा परिणाम संपूर्ण जगावर होण्याची भीती निर्माण झालीय... पाहूया, इराण इस्रायल युद्धाचे भारतावर काय परिणाम होऊ शकतात? हे सांगणारा हा स्पेशल रिपोर्ट...
कानठळ्या बसवणारे आवाज...अॅम्ब्युलन्सचा सायरन
भेदरलेली माणसं, कोलमडलेली घरं
जगात कुठे पडलीय युद्धाची ठिणगी?
युद्धाचे ढग, तेलाला धग
धुमश्चक्रीचा आर्थिक क्षेत्रावर कोणता परिणाम?
इराण-इस्रायल युद्धाचा भारतावर परिणाम
- कच्च्या तेलाच्या किमतीत ५ टक्क्यांची वाढ
- अनेक देशांसह भारताच्या शेअर बाजारावर परिणामाची शक्यता
- रिझर्व्ह बँकेच्या रेपो रेटवर परिणामांची शक्यता
आता इराणने हल्ला केल्यानंतर इस्रायल
इरेला पेटलाय... इराणच्या हल्ल्याला
तोडीस तोड उत्तर देणार असा इशारा
इस्रायलने दिलाय... त्यामुळे, या युद्धाची
झळ संपूर्ण जगालाच बसू शकते...
All Shows

































