Indian National Developmental Inclusive Alliance Collaps : निवडणुकीत भांडण; आता 'इंडिया'ची आठवण
राहुल गांधी नेतृत्व करत असलेली काँग्रेस... आणि ममता बॅनर्जींची तृणमूल काँग्रेस.... दोन्ही इंडिया आघाडीचे प्रमुख घटक पक्ष... पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीत दोन्ही नेते भांड भांड भांडले.. आणि आता पराभवानंतर दोन्ही बाजूंनी इंडिया आघाडीच्या बळकटीकरणाची भाषा सुरू झालीय.. निवडणुकीत दुही आणि पराभवानंतर एकी... हा जणू इंडिया आघाडीचा पॅटर्नच झालाय.. कधी भाजपच्या ऑपरेशन लोटसमुळे, तर कधी स्वतःच्याच राजकीय घोडचुकांमुळे इंडिया आघाडीचे स्तंभ ढासळू लागलेत.. आता यातून धडा घेत इंडिया आघाडी नव्यानं उभारी घेणार की आहे तोच कित्ता गिरवत राहणार? असा प्रश्न उपस्थित होतोय..
पश्चिम बंगालचा गड गमावल्यानंतर ममता बॅनर्जींना आता इंडिया आघाडीची आठवण झालीय...
नुसती आठवणच नाही, तर त्यांच्या तोंडून इंडिया आघाडीच्या बळकटीकरणाची भाषा ऐकल्यानंतर अनेकांना धक्काच बसला असेल...
कारण याच ममता बॅनर्जींनी,
पश्चिम बंगाल विधानसभेसाठी,
इंडिया आघाडीचा प्रमुख घटक पक्ष असलेल्या काँग्रेसचा प्रस्ताव धुडकावला होता...
राहुल गांधी आणि ममता बॅनर्जींमध्ये,
एकमेकांना भाजपची बी टीम ठरवण्याची स्पर्धा रंगली होती
पश्चिम बंगालची सत्ता गमावल्यानंतर, संजय राऊतांनी राहुल गांधींची तळी उचलत ममता बॅनर्जींची कानउघाडणी केलीय
पश्चिम बंगालच्या आखाड्यात, राहुल गांधींनी ममता बॅनर्जींवर टीकेची तोफ डागताना कोणतीच कसर सोडली नाही
मात्र पराभवानंतर राहुल गांधींनी ममता बॅनर्जींना नुसता फोनच नाही केला,
तर तृणमूलच्या पराभवावर आनंद व्यक्त करणाऱ्या काँग्रेस नेत्यांची कानउघाडणी देखील केली
राहुल गांधी आपल्या 'एक्स' पोस्टमध्ये लिहितात की...
काँग्रेसमधील काही जण आणि इतर लोक तृणमूल काँग्रेसच्या पराभवावर आनंद व्यक्त करत आहेत. त्यांनी हे स्पष्ट समजून घेतलं पाहिजे की आसाम आणि बंगालमधील जनादेशाची ‘चोरी’ ही भारतीय लोकशाही नष्ट करण्याच्या भाजपच्या मिशनमधील एक मोठं पाऊल आहे
All Shows































