कोविड टास्क फोर्सचा प्राथमिक शाळा खुल्या करण्यासाठी हिरवा कंदील, राज्य सरकारच्या निर्णयाची प्रतीक्षा
पहिली ते चौथीच्या शाळा कधी सुरू होणार? या अनेक दिवस पालकांना पडलेल्या प्रश्नाचं उत्तर उद्या मिळण्याची शक्यता आहे. उद्या कॅबिनेट बैठकीत पहिली ते चौथीच्या शाळा सुरु करण्यासंदर्भात निर्णय अपेक्षित असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी दिली आहे. याबाबत सार्वजनिक आरोग्य विभागाने ना हरकत दिली आहे. दरम्यान, शहरी भागात पहिली ते सातवी आणि ग्रामीण भागात पहिली ते चौथीपर्यंतच्या शाळा सुरु करण्यास चाईल्ड टास्क फोर्सनं हिरवा कंदील दिलाय. राज्य शासनाने इतर बाबींची पूर्तता केल्यास, शाळा सुरू करण्यास काहीच हरकत नसल्याचा चाइल्ड टास्क फोर्सचं म्हणणं आहे. चाईल्ड टास्क फोर्सनं हिरवा कंदील दाखवला असला तरी शाळा सुरु करण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांच्या संमतीनंतरच होणार आहे.
All Shows
































