Thackeray Group Vs Shinde Group Special Report : ठाकरे गट की शिंदे गट? आत्मपरिक्षण कुणी करावं?
Thackeray Group Vs Shinde Group Special Report : ठाकरे गट की शिंदे गट? आत्मपरिक्षण कुणी करावं?
शिवसेनेतल्या ऐतिहासिक बंडात शिंदे गटात दाखल झालेले शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना आत्मपरिक्षणाचा सल्ला दिला आहे. नागपुरातल्या हिवाळी अधिवेशनात उद्धव ठाकरे आणि दीपक केसरकर यांची विधान परिषदेच्या उपसभापतींच्या दालनात भेट झाली होती. त्यावेळी उद्धव ठाकरे मला भावनेच्या भरात काही बोलले असतील. ते सारं चार भिंतींच्या आड होतं. पण हे सगळं मीडियामध्ये जातं तेव्हा आम्हालासुद्धा त्याची उत्तरं द्यावी लागतात, असं केसरकरांनी एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे. त्यामुळं लोक आपल्याला सोडून जातात तेव्हा आपलं काय चुकलं याचंही ठाकरेंनी आत्मपरीक्षण केलं पाहिजे, असं केसरकरांनी म्हटलं आहे. तसंच आत्मपरीक्षण करण्याऐवजी त्यांच्या बदनामीची मोहीम चालवली तर सोडून गेलेले लोकही त्यावर व्यक्त होणार, असंही केसरकरांनी ठाकरेंना उद्देशून म्हटलं आहे.
All Shows































