एक्स्प्लोर

Vidhan Parishad Election : ठरली उमेदवारी, उदंड बंडखोरी | Special Report ABP Majha

महाराष्ट्रात विधान परिषदेच्या पाच जागांसाठी होणाऱ्या निवडणुकांसाठी उद्या अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे. मात्र त्यापूर्वीच महायुती आणि महाविकास आघाडीत बंडखोरीला उधाण आलंय. विशेषतः सत्ताधारी महायुतीत इच्छुकांची भाऊगर्दी झाल्यामुळे जवळपास प्रत्येक ठिकाणी बंडखोरी होणार असल्याचे संकेत मिळतायत. पुणे शिक्षक मतदारसंघात भाजपच्या अधिकृत उमेदवारानं अर्ज भरला असला तरी शिवसेनेच्या मंगेश चिवटेंनीही पक्षाच्या एबी फॉर्मसह अर्ज भरण्याची तयारी केलीय. तर दुसरीकडं अमरावतीत शिवसेनेकडून किरण सरनाईकांनी अर्ज भरला असताना भाजपकडून तीन नेत्यांनी अर्ज दाखल केलेत. बघूया, या पाचही मतदारसंघांचा आढावा घेणारा हा स्पेशल रिपोर्ट.

महाराष्ट्रात तीन पदवीधर आणि दोन शिक्षक मतदारसंघात होणाऱ्या विधान परिषदेच्या निवडणुकांचं वातावरण आता तापायला सुरुवात झालीय. 

या पाचही ठिकाणी महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यातील स्पर्धेला सुरुवात होण्यापूर्वी महायुतीतच तिकीटासाठी जोरदार रस्सीखेच सुरु झालीय.  

पुण्यात शिक्षक आणि पदवीधर या दोन्ही मतदारसंघातील उमेदवार जाहीर करत भाजपनं या दोन्ही ठिकाणी कुठलीही तडजोड होणार नसल्याचे संकेत दिलेत.

पुणे पदवीधर मतदारसंघातून भाजपची उमेदवारी मिळालेल्या स्मिता जाधव आणि शिक्षक मतदारसंघातून उमेदवारी मिळालेल्या कौस्तुभ गावडे यांनी पुण्यातील कौन्सिल हॉलमध्ये आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.  

विशेष म्हणजे भाजपच्या या दोन्ही उमेदवारांचे अर्ज भरताना शिवसेना आणि राष्ट्रवादीचा एकही नेता तिकडं फिरकला नाही. 

तर महाविकास आघाडीत पुणे पदवीधर मतदारसंघ शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या वाट्याला जाणार असल्यामुळे इथून मुख्यत्वे तीन उमेदवारांनी तिकीटासाठी फिल्डिंग लावलीय. 

तर पुणे शिक्षक मतदारसंघात भाजपच्या कौस्तुभ गावडेंनी उमेदवारी दाखल केली असली तरी इथून शिवसेनेच्या मंगेश चिवटेंनी उमेदवारी भरण्याचा इरादा पक्का केल्याचं समजतंय.

अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच मंगळवारी सर्व शक्तीनिशी चिवटेंची उमेदवारी दाखल करण्याची घोषणा शिवसेनेच्या शहाजीबापू पाटलांनी केलीय. 

यावेळी उदय सामंत, शंभुराज देसाई आणि दादा भुसे असे तीन-तीन मंत्री उपस्थित राहणार असल्यामुळे या उघडउघड बंडखोरीची जोरदार चर्चा रंगलीय. 

शिवाय भाजपकडून तिकीट न मिळाल्याने नाराज झालेल्या सचिन सानप यांनीदेखील आपला उमेदवारी अर्ज दाखल केल्यामुळं भाजपसमोरचं आव्हान वाढलंय. . 

मंगेश चिवटे आणि सचिन सानप यांना मैत्रीची गळ घालत भाजप उमेदवार कौस्तुभ गावडेंनी त्यांच्याकडून पाठिंबा मिळण्याचा विश्वास व्यक्त केलाय. 

तर महायुतीत गँगवॉर सुरु झाल्याचा टोला काँग्रेसनं लगावलाय. 

नागपूर पदवीधर मतदारसंघात महायुती आणि महाविकास आघाडी दोन्हीकडे बंडखोरीची लागण झाल्याचं दिसलं.

भाजपकडून माजी आमदार सुधाकर कोहळे यांनी अधिकृत उमेदवारी अर्ज दाखल केला. 

तर मविआकडून काँग्रेसचे विद्यमान आमदार अभिजीत वंजारींनी अर्ज दाखल केला.

त्यासाठी संपूर्ण महाविकास आघाडीचे नेते एकत्र आल्याचं चित्रही दिसलं. 

मराठवाडा पदवीधर मतदारसंघात महायुतीकडून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सतीश चव्हाण यांनी मंत्री आणि आमदारांच्या उपस्थितीत आपला निवडणूक अर्ज दाखल केला. त्यानंतर त्यांनी एक सभा देखील घेतली.

तर महाविकास आघाडीच्या वतीने चंद्रकांत खैरे आणि अंबादास दानवे यांच्या उपस्थितीत दिलीप घुगे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.

अमरावती शिक्षक मतदारसंघात तर बंडखोरीला अक्षरशः उधाण आल्याचं दिसलं.

काँग्रेसकडून आदिती पोहरे यांना उमेदवारी जाहीर असताना ठाकरेंच्या शिवसेनेच्या दत्तात्रय लहाने यांनी विभागीय आयुक्त कार्यालयात जात आपली उमेदवारी दाखल केली.

विशेष म्हणजे यावेळी खासदार अरविंद सावंत, आमदार नितीन देशमुख, आमदार गजाजन लवाटे यांच्यासह पक्षाचे नेतेही उपस्थित होते. 

तर उमेदवारी जाहीर झालेल्या आदिती पोहरेंनी प्रचाराला सुरुवात केलीय. 

तर महायुतीकडून विद्यमान आमदार किरण सरनाईक यांनी पक्षाचा एबी फॉर्म जोडत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. शिवसेनेचे मंत्री संजय राठोड यावेळी उपस्थित होते. 

पण किरण सरनाईकांनी अर्ज दाखल करण्यापूर्वीच महायुतीत बंडखोरीच्या लाटांवर लाटा उसळताना दिसल्या.

विधान परिषदेच्या या पाच जागांवरील सध्याची चुरस आणि बंडखोरी पाहता दोन्ही बाजूंची सर्वाधिक ताकद ही बंडखोरी शमवण्यावर खर्च होणार, हे स्पष्ट आहे. 

त्यानंतर विरोधकांशी भिडायला दोन्ही उमेदवारांमध्ये आणि आघाड्यांमध्ये किती ताकद उरते, त्यावर प्रचाराचं चित्र अवलंबून असणार आहे. 

All Shows

स्पेशल रिपोर्ट

Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Delimitation Bill: डिलिमिटेशन विधेयक मंजुरीसाठी किती मतं आवश्यक, भाजपप्रणित एनडीए आघाडीला आणखी किती मतांची गरज, जाणून घ्या सगळं गणित
डिलिमिटेशन विधेयक मंजुरीसाठी किती मतं आवश्यक, भाजपप्रणित एनडीए आघाडीला आणखी किती मतांची गरज, जाणून घ्या सगळं गणित
Nilesh Lanke on Delimitation Bill : इंडिया आघाडीची बैठक सोडून निलेश लंके तोरणा किल्ल्यावरील मोहीमेसाठी गेले, प्रत्येक खासदाराला 150 कोटी मिळाल्याच्या आरोपावरही मौन सोडलं, म्हणाले...
इंडिया आघाडीची बैठक सोडून निलेश लंके तोरणा किल्ल्यावरील मोहीमेसाठी गेले, प्रत्येक खासदाराला 150 कोटी मिळाल्याच्या आरोपावरही मौन सोडलं, म्हणाले...
Congress on Delimitation Bill 2026 : मोठी बातमी : प्रणिती शिंदे म्हणाल्या, पवार गटाची देशाशी गद्दारी, सुशीलकुमार शिंदे म्हणतात, डिलिमिटेशन व्हायलाच हवं!
मोठी बातमी : प्रणिती शिंदे म्हणाल्या, पवार गटाची देशाशी गद्दारी, सुशीलकुमार शिंदे म्हणतात, डिलिमिटेशन व्हायलाच हवं!
Sunetra Pawar on Delimitation Bill : डिलिमिटेशन विधेयकावर सुनेत्रा पवारांची मोजक्या शब्दांत प्रतिक्रिया; शरद पवारांच्या पक्षाच्या पाठिंब्याच्या प्रश्नावर घेतला काढता पाय, बारामतीत नेमकं काय घडलं?
डिलिमिटेशन विधेयकावर सुनेत्रा पवारांची मोजक्या शब्दांत प्रतिक्रिया; शरद पवारांच्या पक्षाच्या पाठिंब्याच्या प्रश्नावर घेतला काढता पाय, बारामतीत नेमकं काय घडलं?
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Vijay Wadettiwar PC Sharad Pawar Delimitation Bill : शरद पवारांचा इतिहास हा पाठीत खंजीर खुपसण्याचाच
Pawar Vs Pawar Special Report : पुण्यातील हल्ल्यानंतर पवार विरुद्ध पवार! संघर्ष आता थेट रस्त्यावर!
Pune Crime History : पुण्यात 42 वर्षांनंतरही रक्तरंजित इतिहासाची पुनरावृत्ती!
No Pakistan Series On Netflix : पाकिस्तानी सीरीज नका करू रिलीज | Special Report ABP Majha
SC on FSSAI :  सर्वोच्च न्यायालयाचे FSSAI ला आदेश, शुगर, सॉल्ट, फॅट षटकोनातून फॅक्ट Special Report

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Delimitation Bill: डिलिमिटेशन विधेयक मंजुरीसाठी किती मतं आवश्यक, भाजपप्रणित एनडीए आघाडीला आणखी किती मतांची गरज, जाणून घ्या सगळं गणित
डिलिमिटेशन विधेयक मंजुरीसाठी किती मतं आवश्यक, भाजपप्रणित एनडीए आघाडीला आणखी किती मतांची गरज, जाणून घ्या सगळं गणित
Nilesh Lanke on Delimitation Bill : इंडिया आघाडीची बैठक सोडून निलेश लंके तोरणा किल्ल्यावरील मोहीमेसाठी गेले, प्रत्येक खासदाराला 150 कोटी मिळाल्याच्या आरोपावरही मौन सोडलं, म्हणाले...
इंडिया आघाडीची बैठक सोडून निलेश लंके तोरणा किल्ल्यावरील मोहीमेसाठी गेले, प्रत्येक खासदाराला 150 कोटी मिळाल्याच्या आरोपावरही मौन सोडलं, म्हणाले...
Congress on Delimitation Bill 2026 : मोठी बातमी : प्रणिती शिंदे म्हणाल्या, पवार गटाची देशाशी गद्दारी, सुशीलकुमार शिंदे म्हणतात, डिलिमिटेशन व्हायलाच हवं!
मोठी बातमी : प्रणिती शिंदे म्हणाल्या, पवार गटाची देशाशी गद्दारी, सुशीलकुमार शिंदे म्हणतात, डिलिमिटेशन व्हायलाच हवं!
Sunetra Pawar on Delimitation Bill : डिलिमिटेशन विधेयकावर सुनेत्रा पवारांची मोजक्या शब्दांत प्रतिक्रिया; शरद पवारांच्या पक्षाच्या पाठिंब्याच्या प्रश्नावर घेतला काढता पाय, बारामतीत नेमकं काय घडलं?
डिलिमिटेशन विधेयकावर सुनेत्रा पवारांची मोजक्या शब्दांत प्रतिक्रिया; शरद पवारांच्या पक्षाच्या पाठिंब्याच्या प्रश्नावर घेतला काढता पाय, बारामतीत नेमकं काय घडलं?
Rohit Pawar: तेव्हा देखील नातं बाजूला ठेवून लढलो, आताही तेच करणार; रोहित पवारांची सूचक पोस्ट, सत्तेत जाण्याच्या चर्चांना पूर्णविराम
तेव्हा देखील नातं बाजूला ठेवून लढलो, आताही तेच करणार; रोहित पवारांची सूचक पोस्ट, सत्तेत जाण्याच्या चर्चांना पूर्णविराम
Sharad Pawar on Delimitation bill: ...तर इतिहासात शरद पवारांची नोंद शेलारमामा म्हणून झाली असती, ठाकरे गटाच्या खासदाराची मार्मिक टिप्पणी
...तर इतिहासात शरद पवारांची नोंद शेलारमामा म्हणून झाली असती, ठाकरे गटाच्या खासदाराची मार्मिक टिप्पणी
Sanjay Raut on Amol Kolhe: अमोल कोल्हे कसे जिंकतात तेच बघतो, संजय राऊतांचं ओपन चॅलेंज,
अमोल कोल्हे कसे जिंकतात तेच बघतो, संजय राऊतांचं ओपन चॅलेंज, "शरद पवारांच्या बेईमान राष्ट्रवादीला महाराष्ट्राची ताकद दाखवू'
Sanjay Raut on Delimitation Bill 2026 : पक्ष फोडला, शरद पवारांचं कुटुंब फोडलं, त्याच्या चरणाशी जाणं हा स्वाभिमान....; शरद पवारांच्या नेत्यांच्या डिलिमिटेशनच्या समर्थनावर संजय राऊतांची आगपाखड
पक्ष फोडला, शरद पवारांचं कुटुंब फोडलं, त्याच्या चरणाशी जाणं हा स्वाभिमान....; शरद पवारांच्या नेत्यांच्या डिलिमिटेशनच्या समर्थनावर संजय राऊतांची आगपाखड
Embed widget