एक्स्प्लोर

Mumbai Adivasi Morcha : मुंबईत उलगुलान, अटकेवरुन आरोपांना उधाण | Special Report ABP Majha

एपीएससी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर रोहित पवारांच्या नावाची चर्चा असताना सोमवारी मुंबईत जोरदार ड्रामा झाला... नाशिकहून मोर्चा घेऊन आलेल्या अनेक आदिवासी विद्यार्थ्यांना मुंबईत येण्यापूर्वीच ताब्यात घेतल्याचा आरोप पोलिसांवर झालाय... शिवाय काँग्रेसच्या मुख्यालयात घुसून एनएसयूआयचे नेते आणि विद्यार्थ्यांना ताब्यात घेतल्याचा दावाही काँग्रेसनं केलाय... उलट आदिवासी विद्यार्थ्यांच्या मागण्या मान्य झाल्या असून कुणालाही अटक झाली नसल्याचं भाजपचं म्हणणंय... आदिवासी मोर्चावरून दिवसभर कसं राजकारण रंगलंय, बघुयात हा स्पेशल रिपोर्ट... 

आपल्या विविध मागण्यांसाठी नाशिकहून निघालेला आदिवासी विद्यार्थ्यांचा उलगुलान मोर्चा रविवारी मुंबईत पोहोचला... 

काँग्रेसचं प्रदेश मुख्यालय असलेल्या टिळकभवनात अनेक आंदोलकांची राहण्याची व्यवस्था करण्यात आली होती... 

आदिवासी विद्यार्थ्यांनी आझाद मैदानात निदर्शनं करण्याची मागितलेली परवानगी नाकारण्यात आली... 

त्यानंतर मध्यरात्री टिळकभवनात जोरदार ड्रामा झाला... 

पोलिसांनी रात्रीच्या वेळी बेकायदेशीररित्या घुसून एनएसयूआयचे कार्यकर्ते आणि आंदोलकांना ताब्यात घेतल्याचा आरोप काँग्रेसनं केलाय... 

पहाटे पाचच्या सुमारास काँग्रेसच्या एक्स हँडलवरून विद्यार्थ्यांना अडवलं जात असल्याची पोस्ट करण्यात आली... 

विद्यार्थ्यांची धरपकड झाल्याचे काही व्हिडिओदेखील काँग्रेसनं शेअर केले... 

त्यानंतर दिवसभरात टिळकभवनात पोलीस शिरल्याचा दावा करत अनेक व्हिडिओ काँग्रेसनं सोशल मीडियावर शेअर केले... 

काँग्रेस मुख्यालयाबाहेरही पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता... 

वर्षा गायकवाड, भाई जगताप आदी मुंबईतल्या प्रमुख नेत्यांनी सकाळी तिकडे धाव घेत बंदोबस्त हटवण्याची मागणी केली... 

त्यानंतर पत्रकार परिषद घेत काँग्रेस नेत्यांनी फडणवीस सरकारवर जोरदार हल्लाबोल केला... 

पोलिसांच्या या कथित कारवाईबाबत कायदेशीर लढाई लढण्याचा इशारा काँग्रेसनं दिलाय... 

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी 
टिळकभवनाबाहेरचा पहारा तातडीनं हटवण्याची मागणी केली... 

या वादानंतर एनएसयूआयचे प्रदेशाध्यक्ष सागर साळुंखे आणि आदिवासी आंदोलकांनी काँग्रेसनं केलेल्या आरोपांची पुनरावृत्ती केली... 

दुसरीकडे भाजपनं आदिवासी विद्यार्थ्यांच्या मागण्या मान्य झाल्याचा दावा करत काँग्रेसवर प्रतिहल्ला चढवला...

मात्र काँग्रेसच्या आरोपांवर प्रतिक्रिया देताना महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची थोडी गडबड झाली... 

राज्यात सध्या इतक्या विषयांवर, इतक्या संघटनांची, इतकी आंदोलनं सुरू आहेत... 

की एमपीएससी विद्यार्थ्यांच्या मुद्द्यावर शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार पुण्यात आंदोलन करतायत... 

आणि आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनात कथित धरपकडीवरून काँग्रेसनं वर्षा बंगल्यात घुसण्याचा इशारा दिलाय, हा तपशील महसूलमंत्री विसरले असावेत... 

आंदोलकांचं समाधान करून निदर्शनांची ही धग कमी करण्यात सरकारला यश आलं... 

तर असं गोंधळात पडण्यापेक्षा दुष्काळी परिस्थितीचा सामना करण्यावर मंत्र्यांना लक्ष केंद्रित करता येईल... 

 

 

 

 

All Shows

स्पेशल रिपोर्ट

Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Virat Kohli: विराट कोहली सचिन तेंडुलकरचा 100 शतकांचा विक्रम मोडणार का? टीम इंडियाच्या माजी प्रशिक्षकाचं कोहलीच्या चाहत्यांचं टेन्शन वाढवणारं वक्तव्य...
विराट कोहली सचिन तेंडुलकरचा 100 शतकांचा विक्रम मोडणार का?टीम इंडियाचा माजी प्रशिक्षक म्हणाला...
Beed : खेळाडूंच्या बोगस प्रमाणपत्र घोटाळ्याचा पर्दाफाश करणाऱ्या वैभव चव्हाणचा संशयास्पद मृत्यू, घातपाताचा आरोप; बीडमध्ये खळबळ
खेळाडूंच्या बोगस प्रमाणपत्र घोटाळ्याचा पर्दाफाश करणाऱ्या वैभव चव्हाणचा संशयास्पद मृत्यू, घातपाताचा आरोप; बीडमध्ये खळबळ
चौफेर घेरलेल्या निवडणूक आयोगाचा रिव्हर्स गिअर सुरुच, तीन दिवसात दुसरा निर्णय! SIR मधून वगळलेल्या महाराष्ट्रासह 7 राज्यातील मतदारांना आणखी एक संधी मिळणार
चौफेर घेरलेल्या निवडणूक आयोगाचा रिव्हर्स गिअर सुरुच, तीन दिवसात दुसरा निर्णय! SIR मधून वगळलेल्या महाराष्ट्रासह 7 राज्यातील मतदारांना आणखी एक संधी मिळणार
चीन बांगलादेशला 22 हजार कोटींची लढाऊ विमाने देणार अन् पाकिस्तानी हवाई दल भारतीय सीमेपासून अवघ्या 40 किमी अंतरावर बांगलादेशी पायलट्सना ट्रेनिंग देणार
चीन बांगलादेशला 22 हजार कोटींची लढाऊ विमाने देणार अन् पाकिस्तानी हवाई दल भारतीय सीमेपासून अवघ्या 40 किमी अंतरावर बांगलादेशी पायलट्सना ट्रेनिंग देणार
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Raju Shetti Andolan Kolhapur : 'उसाला द्या दाम' , हायवेवर चक्काजाम Special Report
Ram Purnekar Thane: लोकांनी डोळे उघडण्याचा प्रयत्न केला पण DCM अजून झोपलेत, राम पूर्णेकरांचा घणाघात
Shyamkumar Barve on Pratibha Dhanorkar Video : बसमधील व्हिडिओ केवळ थट्टा-मस्करीचा; खासदार श्यामकुमार बर्वेंचे स्पष्टीकरण
NCP Internal Issue Parth Pawar : नाराजीचे 'ठोके' की 'ऑल ओके'? Special Report
Dia Mirza Controversy : 'दीया'वरून घमासान कोर्टानं उपटले कान Special Report

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Virat Kohli: विराट कोहली सचिन तेंडुलकरचा 100 शतकांचा विक्रम मोडणार का? टीम इंडियाच्या माजी प्रशिक्षकाचं कोहलीच्या चाहत्यांचं टेन्शन वाढवणारं वक्तव्य...
विराट कोहली सचिन तेंडुलकरचा 100 शतकांचा विक्रम मोडणार का?टीम इंडियाचा माजी प्रशिक्षक म्हणाला...
Beed : खेळाडूंच्या बोगस प्रमाणपत्र घोटाळ्याचा पर्दाफाश करणाऱ्या वैभव चव्हाणचा संशयास्पद मृत्यू, घातपाताचा आरोप; बीडमध्ये खळबळ
खेळाडूंच्या बोगस प्रमाणपत्र घोटाळ्याचा पर्दाफाश करणाऱ्या वैभव चव्हाणचा संशयास्पद मृत्यू, घातपाताचा आरोप; बीडमध्ये खळबळ
चौफेर घेरलेल्या निवडणूक आयोगाचा रिव्हर्स गिअर सुरुच, तीन दिवसात दुसरा निर्णय! SIR मधून वगळलेल्या महाराष्ट्रासह 7 राज्यातील मतदारांना आणखी एक संधी मिळणार
चौफेर घेरलेल्या निवडणूक आयोगाचा रिव्हर्स गिअर सुरुच, तीन दिवसात दुसरा निर्णय! SIR मधून वगळलेल्या महाराष्ट्रासह 7 राज्यातील मतदारांना आणखी एक संधी मिळणार
चीन बांगलादेशला 22 हजार कोटींची लढाऊ विमाने देणार अन् पाकिस्तानी हवाई दल भारतीय सीमेपासून अवघ्या 40 किमी अंतरावर बांगलादेशी पायलट्सना ट्रेनिंग देणार
चीन बांगलादेशला 22 हजार कोटींची लढाऊ विमाने देणार अन् पाकिस्तानी हवाई दल भारतीय सीमेपासून अवघ्या 40 किमी अंतरावर बांगलादेशी पायलट्सना ट्रेनिंग देणार
Eknath Shinde : शरद पवारांवर ब्रीच कँडीत उपचार सुरू; एकनाथ शिंदेंसह 'हे' नेते ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल, मुख्यमंत्र्यांनी फोनवरून केली विचारपूस
शरद पवारांवर ब्रीच कँडीत उपचार सुरू; एकनाथ शिंदेंसह 'हे' नेते ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल, मुख्यमंत्र्यांनी फोनवरून केली विचारपूस
योजनांचा लाभ आधार कार्डवर नाही, तर मतदार ओळखपत्रावर ठरणार; राहुल गांधी मोदी सरकारमधील मंत्र्यांचा व्हिडिओ शेअर करत म्हणाले, 'हा कट खूप खोलवर रुजलाय, काळजीपूर्वक समजून घ्या..'
योजनांचा लाभ आधार कार्डवर नाही, तर मतदार ओळखपत्रावर ठरणार; राहुल गांधी मोदी सरकारमधील मंत्र्यांचा व्हिडिओ शेअर करत म्हणाले, 'हा कट खूप खोलवर रुजलाय, काळजीपूर्वक समजून घ्या..'
Vaishnavi Hagawane Case: वैष्णवी हगवणे प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय, सासू लता, पाहुणा निलेश चव्हाणला जामीन मंजूर, जामीन म्हणजे निर्दोष मुक्तता नाही, उच्च न्यायालयानं ठणकावलं
वैष्णवी हगवणे प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय, सासू लता, पाहुणा निलेश चव्हाणला जामीन मंजूर, जामीन म्हणजे निर्दोष मुक्तता नाही, उच्च न्यायालयानं ठणकावलं
Iran War: तरच होर्मुझची सामुद्रधुनी खुली होणार अन् चर्चा करणार! मध्यावधी निवडणुकीत अमेरिकनं जनतेनं ट्रम्पचा हुकुमशाही थाट उतरवला अन् आता इराणच्या सुद्धा चर्चेसाठी 7 अटी
तरच होर्मुझची सामुद्रधुनी खुली होणार अन् चर्चा करणार! मध्यावधी निवडणुकीत अमेरिकनं जनतेनं ट्रम्पचा हुकुमशाही थाट उतरवला अन् आता इराणच्या सुद्धा चर्चेसाठी 7 अटी
Embed widget