Donald Trump On Apple : ट्रम्पचा सल्ला, अॅपल वरुन कल्ला, ट्रम्प यांची पोटदुखी
Donald Trump On Apple : ट्रम्पचा सल्ला, अॅपल वरुन कल्ला, ट्रम्प यांची पोटदुखी
भारत-पाक तणावात मध्यस्थी केल्याचा दावा करणाऱ्या, अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या कतारच्या दौऱ्यात एक मोठं विधान केलं. आणि त्यामुळे भारतातल्या आयफोन उत्पादनांच्या निर्मितीवर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. ट्रम्प यांनी अॅपलचे सीईओ टिम कूक यांना यासंदर्भात काही सूचना दिल्यायत... काय आहे हे एकूण प्रकरण? पाहूयात या खास रिपोर्टमधून...
हे ही वाचा..
भारत आणि पाकिस्तान (Pakistan) यांच्यातील युद्धजन्य परिस्थितीत आपण मध्यस्थी केल्याने दोन्ही देशांनी शस्त्रसंधी कायम ठेवल्याचे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald trump) यांनी म्हटलं होतं. विशेष म्हणजे भारत-पाकिस्तान यांच्यातील युद्धविरामाची घोषणा देखील ट्रम्प यांनीच सर्वप्रथम केली. त्यामुळे, विरोधकांकडून मोदी सरकारवर टीका होऊ लागली. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील भांडणात अमेरिकेचा दबाव का असा प्रश्न उपस्थित होऊ लागला. त्यातच, आपण व्यापार बंद करण्याचा इशारा देत दोन्ही देशांना शस्त्रसंधीचा आग्रह केला, त्यांनी तो मानला त्याबद्दल त्यांचे धन्यवाद असेही ट्रम्प यांनी म्हटले होते. त्यातच, आज कतार येथील उद्योजकांच्या परिषदेत ट्रम्प यांनी अॅपलचे सीईओ टीम कुक यांना फुकटचा सल्ला दिला होता. भारतात आयफोन उत्पादनाच्या कंपन्या नको, ते सक्षम आहेत, असे ट्रम्प यांनी म्हटले होते. त्यानंतर, पुन्हा ट्रम्प यांच्यावर भारतीयांनी नाराजी व्यक्त केली. अभिनेत्री आणि खासदार कंगना रणौतनेही (Kangana ranaut) त्याच अनुषंगाने ट्विट करत ट्रम्प यांच्यापेक्षा मोदीच भारी असल्याचं म्हटलं होतं.
All Shows

































