Dhananjay Munde Special Report : धनंजय मुंडे यांचं मौन की वादळापूर्वीची शांतता? नेमकं काय घडलं?
गोपीनाथगडावर आज मुंडेप्रेमींनी गर्दी केली होती, मुंडेभगिनी आणि धनंजय मुंडे एकत्र आले होते. या ठिकाणी लोकनेत्याच्या आठवणींना उजाळा दिला गेला. सद्यपरिस्थितीवर काही मार्मिक भाष्यही केलं गेलं. पंकजाताईंच्या भाषणा इतकीच उत्सुकता धनंजय मुंडेंच्या भाषणाची होती.गेल्या काही महिन्यात राजकीय आणि वैयक्तिक जीवनात प्रचंड चढउतार पाहायला मिळालेले, आजारपणामुळे बोलण्याला मर्यादा आलेले धनभाऊ काय करणार हा प्रश्न होता. काय घडलं गोपीनाथगडावर ते पाहुयात
दिवंगत गोपीनाथ मुंडे यांची पुण्यतिथीनिमित्त मुंडे बहिणभाऊ गोपीनाथ गडावर एकत्र आले..
त्यांच्या सोबत राज्यातील विविध नेते आणि गोपीनाथ मुंडेंना मानणारा मोठा समुदाय उपस्थित होता.
बऱ्याच दिवसानंतर धनंजय मुंडे यांनी सार्वजनिक कार्यक्रमात दिसले त्यामुळे
धनंजय मुंडे उपस्थितांना संबोधित करणार का याची उत्सुकता होती
मात्र चेहऱ्याच्या एका आजारामुळे धनंजय मुंडे यांनी भाषण टाळले...
ती उणीव पंकजा मुंडे यांनी भरुन काढली
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराडचं नाव आलं आणि धनंजय मुंडे यांच्या अडचणीही वाढल्या... आधी धनंजय मुंडे यांना पालकमंत्रीपद मिळालं नाही नंतर तर मंत्रीपद सुद्धा गमवावं लागलं. मुंडे कुटुंबियासाठी या सगळ्या अडचणीच्या काळावर पंकजा मुंडेंनी भाष्य केलं
धनंजय मुंडे यांना बेल्स पाल्सी या आजाराने ग्रासले आणि त्यांच्या बोलण्यावर मर्यादा आल्या. शिर्डी इथल्या पक्षाच्या अधिवेशनानंतर सार्वजनिक ठिकाणी धनंजय मुंडे यांचे एकही भाषण झाले नाही.. परळीतील जगमित्र कार्यालयात जनता दरबार भरवला, मतदारसंघातील कार्यक्रमात सहभागी झाले.. जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत सहभागी झाले.. मात्र आपल्या भाषणात शायरीच्या माध्यमातून विरोधकांना उत्तर देणारे धनंजय मुंडे भाषणापासून दूर राहिले आहेत...
All Shows































