Congress On Thackeray : ठाकरेंना इशारा, काँग्रेसचा स्वबळाचा नारा?Special Report
राजकारणात कुठल्याही पक्षाची प्रतिमा किती महत्त्वाची असते, याची प्रचिती यायला सुरुवात झालीय. वास्तविक ठाकरेंची शिवसेना आणि मनसे हे दोन्ही मराठीच्या मुद्द्यावर स्थापन झालेले पक्ष. हे दोन्ही पक्ष आगामी महापालिका निवडणुकांसाठी एकत्र येण्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरु आहे. मात्र ठाकरे बंधूंची ही एकी काँग्रेसला मात्र गैरसोयीची वाटू लागलीय. दोन्ही पक्ष मराठीच्या मुद्द्यावर लढणारे असले तरी राज ठाकरेंना सोबत घेणं काँग्रेसला का नकोसं वाटतंय, ठाकरे बंधू एकत्र आले तर काँग्रेसची भूमिका काय असणार, याचा आढावा घेणारा हा स्पेशल रिपोर्ट.
व्हिओ -
उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि राज ठाकरेंची मनसे आगामी महापालिका निवडणुकांसाठी एकत्र येण्याची शक्यता सध्या राजकीय वर्तुळात वर्तवली जातेय.
विशेषतः दोन्ही ठाकरेंनी पुकारलेला मोर्चा आणि मोर्चापूर्वीच सरकारनं मागे घेतलेले हिंदीबाबतचे जीआर यामुळं ठाकरेंच्या एकीची ताकद सिद्ध झाल्याचीही चर्चा आहे.
मात्र या चर्चेचा काँग्रेसच्या भूमिकेमुळं आता नवं वळण मिळण्याची शक्यता आहे.
राज ठाकरेंची भूमिका आपल्याला मान्य नसल्याचं सांगत काँग्रेसनं आपली भूमिका जाहीर केलीय.
त्यामुळं दोन ठाकरे एकत्र आले, तर आपल्याला ठाकरेंसोबत राहण्यात रस नसल्याचं काँग्रेसनं स्पष्ट केलंय.
बाईट - रमेश चेन्नीथला
((कार्यकर्ते तर सगळीकडेच उमेदवार उभे करा , असं म्हणतात पण निर्णय पक्षाला घ्यायचा असतो
राज ठाकरेंची भूमिका आम्हाला मान्य नाही , उत्तर भारत दक्षिण भारत असं नाही भारत एक आहे ही आमची भूमिका))
व्हिओ -
काँग्रेसचे राज्यातले नेते मात्र ठाकरे बंधुंच्या एकत्रीकरणावर किंवा राज ठाकरेंच्या भूमिकेवर थेट टीका करणं टाळत असल्याचं दिसतंय.
मात्र राज ठाकरेंसोबत निवडणूक लढवणं शक्य नसल्याची भाषा राज्यातील नेत्यांच्याही तोंडी येऊ लागलीय.
बाईट - नाना पटोले
((या दोघा भावांच मिलन होत असेल तर त्याच स्वागत केलं पाहिजे. आम्ही मोदी शाह नाहीत की त्यांची घर तोडायला जाऊ. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका कार्यकर्त्यांच्या सोबत चर्चा करून घेऊ. याचा तसा संबंध येत नाही
राज ठाकरे आणि आम्ही एकत्र येणार हा आता प्रश्न नाही.))
व्हिओ -
ठाकरे बंधूंच्या एकत्रीकरणाची चर्चा गेल्या दोन महिन्यांपासून सुरु आहे.
आतापर्यंत या चर्चेबाबत काँग्रेसनं कधीच नकारात्मक प्रतिक्रिया दिली नव्हती.
मात्र पहिलीपासून हिंदी शिकवण्याच्या मुद्द्यावरून दोन्ही ठाकरे अधिक जवळ येत असल्याचं दिसल्यानंतर काँग्रेसनं राज ठाकरेंपासून अंतर राखायला सुरुवात केल्याचं चित्र आहे.
येत्या पाच तारखेला दोन्ही ठाकरे बंधू विजय मेळाव्यात एकत्र येणार आहेत.
त्यानंतर दोन दिवसांनी होणाऱ्या काँग्रेसच्या बैठकीत आघाडीबाबतचं धोरण ठरवण्यात येणार आहे.
बाईट - रमेश चेन्नीथला
((७ तारखेला रमेश चेनिथाला, यू व्ही वेंकटेश मुंबईला जातील
मुंबईत पॉलिटिकल अफेअर्स कमिटीची बैठक होणार तेव्हा निर्णय होईल))
व्हिओ -
गेल्या वर्षी झालेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेससोबत महाविकास आघाडीत असणाऱ्या उद्धव ठाकरेंना मुस्लीम मतांचा फायदा झाल्याचं चित्र होतं.
काँग्रेसला का नकोत राज ठाकरे?
राज ठाकरेंनी गेल्या काही वर्षात हिंदुत्त्ववादी भूमिका घेतलीय.
माहिमची समुद्रातील अनधिकृत मजार हटवणे, मशिदीवरील भोंगे उतरवणे असे विषय अजेंड्यावर घेतले.
तर उद्धव ठाकरेंना लोकसभा निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर मुस्लीम मतं मिळाली होती.
मुंबईतील भायखळा, मुंबादेवी, अणुशक्तीनगर, मानखुर्द, कुर्ला, चांदिवली आणि मालाड मालवणी या भागातील मुस्लीम मतं मोठ्या प्रमाणात ठाकरेंच्या शिवसेनेकडं वळली होती.
राज ठाकरेंमुळं ही मतं दूर जाण्याची काँग्रेसला भीती वाटत असल्याची चर्चा
((ग्राफिक्स आऊट))
व्हिओ -
येत्या पाच जुलैला मराठीप्रेमींच्या विजयोत्सवाच्या निमित्तानं ठाकरे बंधू एका व्यासपीठावर येणार आहेत.
मात्र या जल्लोषासोबत मुंबई महापालिका निवडणुकांची आगामी गणितंदेखील यानिमित्तानं मांडली जाण्याची शक्यता आहे.
पाच तारखेला नेमकं काय घडतं यावर सात तारखेचा काँग्रेसचा निर्णय अवलंबून असणार, एवढं मात्र नक्की.
ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा.
All Shows
































