Chandrakant Patil vs Girish Bapat : अमित शाहांसमोरच चंद्रकांत पाटील आणि गिरीश बापट यांच्यात शीतयुद्ध
Chandrakant Patil vs Girish Bapat : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह दोन रविवारी पुणे दौऱ्यावर आहेत. अमित शाह यांची पुण्यात जाहीर सभा झाली. अमित शाह यांच्या पुणे दौऱ्यादरम्यान प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि पुण्याचे खासदार गिरीश बापट यांच्यातील शीतयुद्ध पाहायला मिळाले. अमित शाह यांच्या दौऱ्यात डावलले गेल्याने नाराज झालेले गिरीश बापट सकाळपासून गायब होते. अमित शाह यांच्या आजच्या दौर्याची सुरुवात जिथून झाली ते श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर बापटांच्या घरापासून अतिशय जवळ असुनही त्यावेळेस अनुपस्थित राहिले. एवढच नाही तर पुणे महापालिकेत आयोजित कार्यक्रमालाही बापट हजर नव्हते. त्यामुळे अमित शाह यांनी बापट कुठे आहेत? अशी विचारणा केली असता, भाजपच्या नेत्यांची धावपळ सुरु झाली.
All Shows
































