CM at Chiplun : कोकणकन्येची हाक, आमदारांचा जनतेला धाक, ही कसली सांत्वनाची पद्धत?
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज चिपळूणचा दौरा केला. दौऱ्यादरम्यान पुरग्रस्त चिपळूणकरांनी आपल्या व्यथा मुख्यमंत्र्यांसमोर मांडण्याचा प्रयत्न केला परंतु आमदार भास्कर जाधव यांनी धाक देत अरेरावी करत त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला. पाहा माझाचा हा खास रिपोर्ट.
दरम्यान, वारंवार संकटे येत आहेत हे लक्षात घेऊन या सर्व सबंधित जिल्ह्यांमध्ये एनडीआरएफच्या धर्तीवर स्वतंत्र यंत्रणा उभी करण्यात येईल. राज्य आपत्ती निवारण दले म्हणजेच एसडीआरएफ आहेच पण ते अधिक सक्षम करु. अशा घटना घडू नये म्हणून पूर व्यवस्थापन करणारी योग्य यंत्रणा कार्यान्वित करणार आहोत, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. मुख्यमंत्र्यांनी आज चिपळूणचा दौरा केला. यावेळी त्यांनी पूरपरिस्थितीची पाहणी करुन बाधितांना योग्य ती मदत करण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले.
ते म्हणाले की, दोन चार दिवसांमध्ये राज्यातील पूरपरिस्थितीतील नुकसानीचा आर्थिक आढावा घेण्यात येईल मात्र आता लगेच तातडीची मदत म्हणून अन्न औषध कपडेलत्ते व इतर आवश्यक त्या गोष्टी पूरग्रस्तांना तात्काळ देण्याबाबत सबंधित जिल्हाधिकार्यांना निर्देश दिले आहेत, असं मुख्यमंत्री म्हणाले.