Baba Siddiqui Case बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणातला प्रमुख आरोपी झीशान अख्तर नेमका कोण? Special Report
गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दिकींची मुंबईत हत्या झाली. या हत्येमागे लॉरेन्स बिश्नोई गँगचा हात असल्याचं समोर आलंय. या प्रकरणात सध्या बिश्नोई गँगशी संबंधित संशयित पोलिसांच्या ताब्यात आहेत. पण या हत्येचा सूत्रधार मानला जाणारा झीशान अख्तर कॅनडात पळाला होता. मात्र कॅनडात लपलेल्या झीशानला बेड्या ठोकण्यात आल्याची माहिती आहे. हा झीशान नेमका कोण आहे? त्याचा बिश्नोई गँगशी संबंध कसा आला? जाणून घेऊयात या खास रिपोर्टमधून.....
झीशान अख्तर...
राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणातला
प्रमुख आरोपी असलेल्या याच झीशानला
कॅनडामध्ये बेड्या ठोकण्यात आल्यायत...
हा झीशान अख्तर नेमका कोण आहे ते पाहूयात...
कोण आहे झीशान अख्तर? ---------------------------------- जालंधरच्या नकोदरमधील शंकर गावचा रहिवासी टार्गेट किलिंग, खून, दरोडा असे ९ गंभीर गुन्हे दाखल ७ जून २०२४ ला तुरुंगातून बाहेर आला तुरुंगात असताना झीशान बिश्नोई गँगच्या संपर्कात लॉरेन्स बिश्नोई गँगचा गँगस्टर विक्रम ब्रारच्या सांगण्यावरुन पहिला खून सिद्धू मूसेवाला हत्येत सामील सौरभ महाकालसह केली पहिली हत्या
पोलीस तपासात या हत्येचे धागेदोरे जालंधरच्या झीशान अख्तरपर्यंत पोहोचले हत्येनंतर तो परदेशात पळून गेला... असा दावा आहे की झीशानला कॅनडात पळून जाण्यास एका पाकिस्तानी डॉनचाही हात होता... काही दिवसांपूर्वीच याच झीशाननं यासंदर्भात एक व्हिडीओ पोस्ट केला होता...
All Shows

































