Ajit Pawar NCP : दादांचा पक्ष, तिघांचं लक्ष, कुणावर काय जबाबदारी? Special Report
बातमी राज्याच्या राजकारणातून... अजित पवारांच्या अपघाती निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये अनेक बदल होतायत... आता दादांच्या कुटुंबातल्या तिघांकडे पक्षाच्या संघटनात्मक बांधणीची जबाबदारी वाटून देण्यात आल्याचं सांगितलं जातंय... पक्षानं मात्र या चर्चेचा इन्कार केलाय... बघुयात हा स्पेशल रिपोर्ट....
पहाटे-पहाटे उठून कामाला लागणारे... सर्व राज्याचा आवाका असलेल्या अजित पवारांच्या निधनामुळे राष्ट्रवादीत मोठी पोकळी निर्माण झालीये...
दादांशिवाय पक्ष चालवण्याची सवय लावून घेताना आता पक्षात तीन पातळ्यांवर नेतृत्वाचा निर्णय घेण्यात आलाय...
त्यानुसार आता उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे संपूर्ण राज्याची जबाबदारी असेल...
तर राज्यसभा खासदार पार्थ पवार हे दिल्ली आणि मुंबई या दोन महत्त्वाच्या शहरांवर लक्ष केंद्रीत करतील...
अजितदादांचे कनिष्ठ पुत्र जय पवार यांना बारामती, शहर तसंच ग्रामीण पुण्याची जबाबदारी असेल...
या नव्या रचनेकडे नीट लक्ष दिलं, तर सर्व जबाबदाऱ्या या पवार कुटुंबीयांमध्येच विभागल्याचं स्पष्ट होतंय...
अजितदादांच्या अकस्मिक निधनानंतर पक्षावर पकड मजबूत करण्यासाठी काही ज्येष्ठ नेते प्रयत्न करत असल्याची चर्चा रंगली होती...
मात्र या सर्व चर्चांना पूर्णविराम देत सुनेत्रा पवार या उपमुख्यमंत्रीही झाल्या अन् पक्षाध्यक्षाही...
त्यानंतर आता या नव्या संघटनात्मक रचनेचं राष्ट्रवादीच्या नेत्यांनी स्वागत केलंय...
काहींनी सावध, तर काहींनी मोकळ्या मानानं..
All Shows
































