(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Nilesh Lanke Majha Katta : शरद पवारांना वचन, दादांची साथ सोडली, नगर जिंकले, निलेश लंके माझा कट्टावर
Nilesh Lanke Majha Katta : शरद पवारांना वचन, दादांची साथ सोडली, नगर जिंकले, निलेश लंके माझा कट्टावर.. पाहा
हे देखील वाचा
Narendra Modi Cabinet : मोदींच्या तिसऱ्या मंत्रिमंडळाचा चेहरा कसा असेल? कोणत्या राज्यातून कोण-कोण मंत्री असणार?
नवी दिल्ली : नरेंद्र मोदी हे तिसऱ्यांदा शपथ घेणार असून रविवारी संध्याकाळी 7.15 वाजता त्यांचा शपथविधी होणार आहे. नरेंद्र मोदींसोबत जवळपास एकूण 52 ते 55 मंत्री (Narendra Modi Cabinet) शपथ घेऊ शकतात. त्यामध्ये 19 ते 22 कॅबिनेट मंत्री आणि सुमारे 33 ते 35 राज्यमंत्री शपथ घेऊ शकतात अशी माहिती आहे. एनडीए आघाडीतील टीडीपी, जेडीयू, एलजेपीसह आरएलडी, जनसेना, जेडीएस आणि अपना एनडीएचे घटक म्हणून सरकारमध्ये सामील होऊ शकतात. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, टीडीपीला कॅबिनेट, दोन राज्यमंत्री मिळू शकतात. तर जेडीयूला कॅबिनेट आणि राज्यमंत्रीपद मिळू शकते.
शिवसेना, एलजेपी, आरएलडी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रत्येकी एक मंत्री सरकारमध्ये सामील होणार असल्याची माहिती आहे. मोदी सरकारच्या मंत्रिमंडळात जातीपेक्षा प्रादेशिक समतोलावर भर दिला जाणार आहे. मंत्रिमंडळात उत्तर, दक्षिण, पूर्व आणि पश्चिम भागातल्या खासदारांना संधी मिळणार आहे. मंत्र्यांची निवड करताना त्यांचा अनुभव आणि शिक्षणही विचारात घेतले जात आहे.