Hamid Dabholkar-Mukta Dabholkar on Majha Katta:डाॅ. नरेंद्र दाभोळकर प्रकरणाच्या लढ्याचे 10 वर्ष
Hamid Dabholkar-Mukta Dabholkar on Majha Katta:डाॅ. नरेंद्र दाभोळकर प्रकरणाच्या लढ्याचे 10 वर्ष दिवस २० ऑगस्ट २०१३, स्थळ पुण्यातील महर्षी विठ्ठल रामजी शिंदे पुल ,वेळ सकाळी सव्वासात...अवघ्या महाराष्ट्राला पुरोगामी विचारांची शिदोरी देणाऱ्या विचारवंताची हत्या. अखेर ११ वर्षांचा काळ लोटल्यानंतर महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणाचा निकाल लागला. निर्घृण हत्या प्रकरणात पाचपैकी तीन आरोपींची पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता झाली. सचिन अंदुरे आणि शरद कळसकर यांना दोषी ठरवत सश्रम जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली, तर कट रचल्याचा आरोप असलेल्या विरेंद्र तावडेसह संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावेची निर्दोष मुक्तता करण्यात आलीये. निर्दोष आरोपींविरोधात दाभोलकर कुटुंबीय उच्च न्यायालयात दाद मागणार आहेत. पण या ११ वर्षांच्या प्रदीर्घ काळात काय काय घडलं? निकालावर समाधान व्यक्त केलं तरी उच्च न्यायालयाकडून काय अपेक्षा आहेत? हत्या प्रकरणाच्या तपासात किती चढ-उतार आले...कोण कोणत्या समस्यांना तोंड द्यावं लागलं...आजही कशी सुरू आहे अंधश्रद्धा निर्मूलन समितीची चळवळ?.... त्यावेळी देशभरात झालेल्या विचारवंतांच्या हत्या आणि त्या घडवणाऱ्या मास्टरमाईंडचा शोध कसा लागेल याविषयी बोलण्यासाठी आपण आमंत्रीत केलयं हमिद दाभोलकर आणि मुक्ता दाभोलकर यांना