TOP 50 : आत्तापर्यंतच्या 50 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 50 न्यूज : 13 June 2024 : ABP Majha
सरकारसोबत चर्चा करण्यासाठी आमचे दरवाजे केव्हाही उघडे, मनोज जरांगेंची प्रतिक्रिया, तर अंमलबजावणीसाठी बारा- बारा महिने लागतात का, जरांगेंचा सरकारला सवाल.
नीट यूजी २०२४ मध्ये ग्रेस मार्क मिळालेल्या १ हजार ५६३ मुलांचे निकाल रद्द करणार,नीट घोळाबाबत सुप्रीम कोर्टात केंद्र सरकारची माहिती, निकाल रद्द झालेल्यांना पुन्हा परीक्षा देण्याची सरकारची मुभा
लोकसेवकाने अहंकारी असू नये, असं मोहन भागवत म्हणाले. पण अहंकाराच्या सर्व मर्यादा मोदी आणि शाहांनी तोडल्यात, भाजपात तुमचे खूप लोक आहेत. ते मोदी आणि शाहांविरोधात बंडखोरी करणार का? संजय राऊतांचा भागवतांना सवाल.
दीड लाखांच्या लाच प्रकरणात राज्याचे पुरातत्व आणि वस्तुसंग्रहालय संचालनालय संचालक तेजस गर्गे यांचं निलंबन, सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवारांची कारवाई.
मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यातील निवासस्थानाबाहेर सुपरमॅक्स कंपनीच्या कामगारांचं आंदोलन, दोन वर्ष सुपरमॅक्स कंपनीचा प्रलंबित विषय मार्गी न लागल्याने कामगार आक्रमक.