एक्स्प्लोर

YouTube Money Sources : फक्त लाखो व्ह्यूवजमुळे नाही तर यूट्यूबर्सना 'या' चार माध्यमातून पैसे मिळतात, कॉमेडियनने सगळंच सांगितलं

YouTubers Income Sources : जर दर्शकांचा मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळाला तर यूट्यूबवर क्रिएटर्सना अनेक माध्यमातून पैसे कमावता येतात. त्यासाठी चार माध्यमांचा वापर करता येतो. 

मुंबई : कुणाल कामरानंतर (Kunal Kamra) आणखी एका कॉमेडियनची चर्चा सुरू आहे. प्रसिद्ध कॉमेडियन (Stand Up Comedian) साहिल शाह (Sahil Shah) सध्या त्याच्या नवीन स्टँड-अप स्पेशल 'Broken' साठी चर्चेत आहे. 'ब्रोकन' या शोच्या माध्यमातून जीवनातील वैयक्तिक संघर्ष आणि मानसिक आरोग्यावर भाष्य केलं जातंय.  एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्याने प्रेक्षकांचा मिळणारा पाठिंबा किती महत्त्वाचा असतो यावर भाष्य केलं. 

स्टँड अप कॉमेडी (Stand Up Comedy) करताना त्याला मिळणारा पाठिंबा आणि फॅन वर्ग हा अतिशय महत्त्वाचा असल्याचं साहिल शाहने सांगितलं. त्यावेळी त्याने कुणाल कामराचा किस्साही सांगितला. कुणाल कामराने राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केलेल्या व्यंगात्मक कवितेनंतर (Kunal Kamra Poem On Eknath Shinde) त्या शोच्या ठिकाणाची तोडफोड करण्यात आली होती. त्यावेळी स्कॅनिंगच्या माध्यमातून एका चाहत्याने कुणाल कामराला 10 हजार रुपये पाठवले होते. कुणाल कामराने त्याचे काम करत राहावे यासाठी ते पैसे पाठवल्याचं त्या चाहत्याने म्हटलं असल्याचं साहिल शाहने सांगितलं. 

त्याचसोबत यूट्यूबच्या माध्यमातून पैसे कसे कमावले जातात, कोणत्या माध्यमातून पैसे मिळतात त्याची सर्व माहिती साहिल शाहने सांगितली. 

YouTube वर पैसे कसे पाठवायचे?

Super Chat (लाइव्ह स्ट्रीम दरम्यान): जेव्हा एखादा क्रिएटर YouTube वर लाइव्ह येतोतेव्हा दर्शक सुपर चॅटद्वारे त्याला पैसे पाठवू शकतात. यामध्ये दर्शक चॅट बॉक्समधील मेसेजसोबत पैसे पाठवतात आणि जितके जास्त पैसे पाठवले जातात तितका मेसेज हायलाइट केला जातो. त्यामुळे क्रिएटर तो मेसेज सहज पाहू शकतो. 

Super Thanks  (रेकॉर्ड केलेल्या व्हिडीओवर): व्हिडीओ लाईव्ह नसल्यास, दर्शक व्हिडीओच्या खाली दिसणारे सुपर थँक्स वापरू शकतात. यामध्ये, दर्शक त्यांच्या इच्छेनुसार, 40 रुपये ते 2000 रुपयांपर्यंत कितीही रक्कम पाठवू शकतात. अशा प्रकारे दर्शक व्हिडीओवर क्रिएटरला पाठिंबा देऊ शकतात.

Paid Memberships : काही क्रिएटर्स त्यांच्या चॅनेलवर Paid Memberships ऑफर करतात. त्यामध्ये दर्शक प्रत्येक महिन्याला ठराविक रक्कम भरून एक्स्क्लुझिव्ह कंटेंट पाहू शकतात. तसेच काही विशेष लाभही मिळवू शकतात. ही पद्धत क्रिएटर्सना पाठिंबा देण्याचा उत्तम मार्ग आहे.

UPI / External Links : बरेच निर्माते UPI ID, Patreon, किंवा PayPal सारख्या बाह्य लिंक व्हिडीओ डिस्क्रिप्शनमध्ये देतात किंवा ते पिन करुन शेअर करतात. त्या ठिकाणी दर्शक थेट पैसे पाठवू शकतात आणि क्रिएटरला मदत करु शकतात.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Vande Bharat Sleeper Train : भारतातील पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन कोलकाता- गुवाहाटी दरम्यान धावणार, प्रवासी क्षमता, तिकीट दर संपूर्ण माहिती
पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन कोलकाता- गुवाहाटी दरम्यान धावणार, प्रवासी क्षमता, तिकीट दर संपूर्ण माहिती
ITC : केंद्र सरकारचा एक निर्णय अन् ITC चे 50 हजार कोटी स्वाहा, एलआयसीसह म्युच्युअल फंड्सचं देखील मोठं नुकसान
केंद्र सरकारचा एक निर्णय अन् ITC चे 50 हजार कोटी स्वाहा, एलआयसीसह म्युच्युअल फंड्सचं देखील मोठं नुकसान
BMC Election : मुंबईत शिवसेनेला 90 जागा, 35 जणांची बंडखोरी, नाराजांची समजूत काढण्यासाठी नेते रिंगणात, उद्याचा दिवस निर्णायक
मुंबईत शिवसेनेला 90 जागा, 35 जणांची बंडखोरी, नाराजांची समजूत काढण्यासाठी नेते रिंगणात, उद्याचा दिवस निर्णायक
राज्यातील 8 महापालिकेतून 22 उमेदवार बिनविरोध, भाजपचे सर्वाधिक; शिवसेना-राष्ट्रवादीचे किती
राज्यातील 8 महापालिकेतून 22 उमेदवार बिनविरोध, भाजपचे सर्वाधिक; शिवसेना-राष्ट्रवादीचे किती

व्हिडीओ

Keluskar BJP Special Reportएबी फॉर्मची कलर झेरॉक्स जोडून केळुस्कर दाम्पत्यानं उमेदवार अर्ज कसा भरला?
Salman Khan Battle of Galwanसिनेमामुळे चीनचा तीळपापड,भाईजानच्या चित्रपटावरून चीन चिडलाSpecial Report
Zero Hour Full Episode : महापालिका निवडणुकीत बंडखोरीचा फटाक कोणाला बसेल?
Navi Mumbai Election : नवी मुंबईत शिवसेना आणि भाजपात काटें की टक्कर, स्थानिक पत्रकारांचा अंदाज काय?
Latur Municipal Elections : लातूर भाजपामध्ये नाराजीचा स्फोट; निष्ठावंत कार्यकर्त्यांचे बंडाचे निशाण

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Vande Bharat Sleeper Train : भारतातील पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन कोलकाता- गुवाहाटी दरम्यान धावणार, प्रवासी क्षमता, तिकीट दर संपूर्ण माहिती
पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन कोलकाता- गुवाहाटी दरम्यान धावणार, प्रवासी क्षमता, तिकीट दर संपूर्ण माहिती
ITC : केंद्र सरकारचा एक निर्णय अन् ITC चे 50 हजार कोटी स्वाहा, एलआयसीसह म्युच्युअल फंड्सचं देखील मोठं नुकसान
केंद्र सरकारचा एक निर्णय अन् ITC चे 50 हजार कोटी स्वाहा, एलआयसीसह म्युच्युअल फंड्सचं देखील मोठं नुकसान
BMC Election : मुंबईत शिवसेनेला 90 जागा, 35 जणांची बंडखोरी, नाराजांची समजूत काढण्यासाठी नेते रिंगणात, उद्याचा दिवस निर्णायक
मुंबईत शिवसेनेला 90 जागा, 35 जणांची बंडखोरी, नाराजांची समजूत काढण्यासाठी नेते रिंगणात, उद्याचा दिवस निर्णायक
राज्यातील 8 महापालिकेतून 22 उमेदवार बिनविरोध, भाजपचे सर्वाधिक; शिवसेना-राष्ट्रवादीचे किती
राज्यातील 8 महापालिकेतून 22 उमेदवार बिनविरोध, भाजपचे सर्वाधिक; शिवसेना-राष्ट्रवादीचे किती
भाजपने खातं खोललं, पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवारांना 'दे धक्का'; रवी लांडगे सलग दुसऱ्यांदा बिनविरोध
भाजपने खातं खोललं, पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवारांना 'दे धक्का'; रवी लांडगे सलग दुसऱ्यांदा बिनविरोध
Prakash Surve : मुलाला उमेदवारी नाही प्रकाश सुर्वे नॅाट रिचेबल? महायुतीच्या उमेदवारांची तक्रार, एकनाथ शिंदे नाराज, पक्षशिस्तीची कारवाई होण्याची शक्यता
मुलाला उमेदवारी नाही प्रकाश सुर्वे नॅाट रिचेबल? महायुतीच्या उमेदवारांची तक्रार, एकनाथ शिंदे नाराज
Video: बजरंग सोनवणेंनी खिशातून काढलेली 500 ची नोट अजित पवारांनी नाकारली; व्हिडिओ व्हायरल
Video: बजरंग सोनवणेंनी खिशातून काढलेली 500 ची नोट अजित पवारांनी नाकारली; व्हिडिओ व्हायरल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 1 जानेवारी 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 1 जानेवारी 2026 | गुरुवार
Embed widget