Whatsapp : आता कोणीही तुमच्या DP चा स्क्रीनशॉट घेऊ शकणार नाही; व्हॉट्सॲपचं नवीन फीचर
Whatsapp : कोणताही वापरकर्ता तुमच्या व्हॉट्सॲप डीपीचा स्क्रीनशॉट घेऊ शकणार नाही.
Whatsaapp New Feature : व्हॉट्सॲप (Whatsapp) आपल्या यूजर्ससाठी अॅपमध्ये सतत नवीन अपडेट घेऊन येत असतात. जेणेकरून यूजर्स अॅपकडे (Whatsapp App) आकर्षित होतील. यामध्ये सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे व्हॉट्सअप ज्या पद्धतीने यूजर्सची प्रायव्हसी मेंटेन करून ठेवतात. या गोष्टी यूजर्ससाठी फार दिलासादायक असतात. याच उद्देशाने व्हॉट्सअपने यूजर्ससाठी एक नवीन फीचर आणलं आहे. या फीचरच्या माध्यमातून तुमच्या व्हॉट्सअप DP चा कोणीही स्क्रिनशॉट घेऊ शकणार नाही. हे फीचर नेमकं कसं काम करतं? याच संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात.
WhatsApp चं नवीन फीचर
व्हॉट्सअपने सुरु केलेल्या या नवीन फीचरच्या माध्यमातून आता कोणीही तुमच्या डीपीचा स्क्रिनशॉट घेऊ शकणार नाही. व्हॉट्सअपने गेल्या महिन्यातच या फीचरचं बीटा व्हर्जन लॉन्च केलं होतं. पण, आता कंपनीने हळूहळू सर्वसामान्य यूजर्ससाठी देखील हे नवीन फीचर आणण्यास सुरुवात केली आहे. यूजर्सच्या गोपनीयतेची काळजी घेण्यासाठी आणि सुरक्षा अधिक मजबूत करण्यासाठी व्हॉट्सअपने हे नवीन फीचर सुरु केलं आहे.
WabetaInfo च्या रिपोर्टनुसार, WhatsApp फेब्रुवारी महिन्यापासून या फीचरची चाचणी करत आहे. पण, आत कंपनीने सर्व यूजर्सच्या मोबाईलमध्ये हे अपडेट देण्यास सुरुवात केली आहे. हे सर्व्हर-साईट अपडेट आहे आणि ते हळूहळू जगभरातील यूजर्ससाठी प्रसिद्ध केलं जात आहे.
स्क्रीनशॉट ब्लॉक
व्हॉट्सॲपच्या या नवीन अपडेटमुळे कोणीही यूजर्सच्या प्रोफाईल पिक्चरचा स्क्रीनशॉट घेऊ शकणार नाही. आता जर यूजर्सनी तुमच्या मित्र परिवाराच्या प्रोफाईल पिक्चरचा स्क्रीनशॉट घेतला तर त्यांच्या फोनमध्ये ब्लॅक स्क्रीनचा स्क्रीनशॉट सेव्ह होईल. व्हॉट्सॲपचे हे अपडेट सर्व्हर साईटवर अपडेट आहे आणि ते टप्प्याटप्प्याने लोकांसाठी आणले जात आहे.
जर तुम्हाला या फीचरची अद्याप माहिती किंवा अपडेट मिळालं नसेल तर यूजर्सना काही दिवस प्रतीक्षा करण्याची गरज आहे. तुम्हाला लवकरच अपडेटची सूचना मिळेल. या अपडेटनंतर, कोणीही प्रोफाईल फोटोचा स्क्रीनशॉट घेतल्यास, ब्लॅक स्क्रीन इमेज सेव्ह होईल. व्हॉट्सॲपचे स्क्रीनशॉट ब्लॉक करण्याचे हे फीचर बाय डीफॉल्ट अॅक्टिव्ह केलं आहे. त्यामुळे ते तुम्हाला डिलीट किंवा बंद करता येणार नाही. यामुळे यूजर्सच्या सुरक्षेसाठी व्हॉट्सअपचं हे फीचर फार चांगलं आहे अशा कमेंट्सही सोशल मीडियावर येत आहेत.
महत्त्वाच्या बातम्या :