Upcoming Phones In September 2023 : टेक कंपन्या भारतात अनेक विविध फोन सतत लाँच करत असतात. ऑगस्ट महिन्यात शाओमी (Xiaomi), मोटोरोला (Motorola), इन्फिनिक्स (Infinix) आणि वनप्लस (OnePlus) यासारख्या अनेक कंपन्या नवीन स्मार्टफोन लाँच केले आहेत. हे स्मार्टफोन मोठ्या प्रमाणात लोकांच्या पसंतीस उतरले. या भन्नाट फोनने अनेक लोकांचे लक्ष वेधून घेतले. आॅगस्टप्रमाणेच सप्टेंबरमध्येही अनेक नवीन मोबाईल फोन बाजारात दाखल होणार आहेत.
'या' महिन्यात लॉंच होणारे स्मार्टफोन
iPhone 15 Series
जगप्रसिद्ध मोबाईल कंपनी अॅपलने 12 सप्टेंबर रोजी त्याचे नवीन गॅजेट्स (iPhone 15) बाजारात आणण्याची घोषणा केली आहे. आयफोन 15, आयफोन 15 प्रो मॅक्स, आयफोन 15 अल्ट्रा बाजारात येणार आहे. iPhone 15 मध्ये 6.1-इंचाचा लिक्विड रेटिना डिस्प्ले दिला जाण्याची अपेक्षा आहे. असे म्हटले जात आहे की, त्याच्या सर्व मॉडेल्समध्ये डायनॅमिक आयलँड-स्टाईल डिस्प्ले असेल. या नवीन सीरिजमध्ये A16 बायोनिक चिपसेट दिला जाऊ शकतो.
Honor 90
Honor भारतात आपला स्मार्टफोन Honor 90 लाँच करणार आहे. हा फोन भारतात लाँच करण्याआधी चीनमध्ये लाँच केला गेला आहे. हा फोन ग्लोबल स्पेसिफिकेशनसह भारतात सादर केला जाईल.6.7-इंचाच्या OLED डिस्प्लेसह हा फोन बाजारात लाँच करण्यात येणार आहे असे सांगितले जाक आहे.
Moto G84 5G
Moto G84 5G नुकताच लाँच झालेला आहे. Moto G84 5G व्हेगन लेदर फिनिशिंगसह Viva Magenta आणि Marshmallow ब्लू कलर ऑप्शनमध्ये लॉन्च करण्यात आला आहे. Moto G84 5G मध्ये 120Hz रिफ्रेश रेट आणि 6.55-इंच फुल-एचडी + pOLED डिस्प्ले आहे.
Samsung Galaxy S23 FE
Samsung Galaxy S23 FE कंपनी लवकरच लाँच करणार आहे. सॅमसंग हा फोन सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात लॉन्च करण्यात येऊ शकतो. मोबाईल फोनची किंमत 50 ते 60,000 दरम्यान असू शकते. स्मार्टफोनमध्ये 120hz च्या रिफ्रेश रेटसह 6.4-इंचाचा FHD + डायनॅमिक AMOLED डिस्प्ले असेल. आगामी फोन Qualcomm Snapdragon 8 Gen 1 किंवा Exynos 2200 चिपसेट असू शकतो.
Realme C51
Realme कंपनीचा आगामी बजेट स्मार्टफोन Realme C51 भारतात 4 सप्टेंबर रोजी लाँच होणार आहे. हा स्मार्टफोन 6.7-इंच लांबीच्या HD+ डिस्प्लेसह लाँच करण्यात येणार आहे. तसेच हा स्मार्टफोन 90Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करेल आणि Unisoc T612 ऑक्टा-कोर प्रोसेसरसह येऊ शकतो.
इतर महत्वाच्या बातम्या
Instagram Threads : इंस्टाग्राम थ्रेड्समध्ये 'कीवर्ड सर्च' पर्याय होणार उपलब्ध, लवकरच येणार नवं फिचर