Threads Keyword Search Feature : मेटाने जुलै महिन्यात Threads App लाँच केले होते. युजर्सकरता यात अनेक अपडेट्स देखील देण्यात आले. सुरुवातीस मेटाचा यूजरबेस चांगला वाढला होता. मात्र आता X (Twitter) यूजर्सला देत असलेल्या भन्नाट अपडेट्समुळे Threads वापरणाऱ्या यूजर्सची संख्या कमी झाली आहे. कमी झालेल्या यूजर्सची संख्या वाढवण्याकरता कंपनीने आता पुन्हा एकदा नवीन फीचर लागू करणार आहे. कंपनी 'कीवर्ड सर्च' फीचरवर काम करत आहे जे सध्या फक्त ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमधील वापरकर्त्यांसाठी लाइव्ह आहे. या फीचरच्या मदतीने यूजर्स कोणत्याही टाॅपिकविषयी सहज सर्च करू शकतात. हे ट्विटरवरील सर्च फीचरप्रमाणेच आहे.
लवकरच इतर देशांमध्येही हे फीचर लाइव्ह करण्यात येणार आहे. या संबंधित मेटा सीईओ मार्क झुकरबर्गने एक पोस्ट शेअर करत लिहिले आहे, आता लवकरच तुम्हाला Threads मध्ये 'कीवर्ड सर्च' फीचर मिळणार आहे. ज्याचा मदतीने तुम्ही कोणत्याही टाॅपिकविषयी सहज सर्च करू शकणार आहात.
कंपनीने काही दिवसांपूर्वी घोषणा केली होती की, थ्रेड्सचं वेब व्हर्जन आणण्यावर काम करत आहे. हे काम आता पूर्ण झाले असून तु्म्ही आता वेबच्या मदतीने मेटाने थ्रेड्स ओपन करू शकता. याचाच अर्थ थ्रेड्स वापरण्याकरता वेब व्हर्जन सुरू झाले आहे. या वेब व्हर्जनमुळे यूजर्स थेट पोस्ट करू शकतील, त्यांचे फीड पाहू शकतील आणि डेस्कटॉपवरून पोस्टशी संवाद साधू शकतील.
थ्रेड्सचं (Threads) चे वेब व्हर्जन चालवण्याकरता तुम्हाला गूगलवर www.threads.net टाईप करावे लागेल. गूगल व्यतिरिक्त हे MacOS वर देखील ही Website ओपन होऊ शकते. सध्या कंपनीने याबाबत कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही. मेटा लवकरच या विषयावर लोकांना अपडेट करेल.
कशा प्रकारे लाॅगिन करावे
- सर्वात पहिले Google वर जा आणि www.threads.net असे टाका.
- त्यानंतर तुमचे Instagram चे डिटेल्स त्यात भरा. जसे की, यूजरनेम आणि पासवर्ड
- असे केल्यावर तुमच्या फोन नंबरवर एक OTP येईल तो भरा. असे सगळे केल्यास तुमचे थ्रेड्स खाते उघडले जाईल.
Threads App ची वैशिष्ट्य
थ्रेड्स हे Instagram चे एक नवीन अॅप आहे जे यूजर्सना टेक्स्ट, लिंक शेअर करण्याची आणि इतर यूजर्सच्या मेसेजला रिप्लाय देऊन संभाषण सुरु करू शकतो. तसेच, यूजर्स आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून देखील लॉग इन करू शकतात. मेटा हे फोटो आणि व्हिडीओ शेअरिंग प्लॅटफॉर्म आहे. यामध्ये टॉप ब्रॅंड, प्रसिद्ध सेलिब्रिटी आणि कंटेंक क्रिएटर्स यांचा समावेश आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
आता चुकीची माहिती पसरविताना आळा बसणार; Google चं AI जनरेट फोटोंसाठी खास वॉटरमार्क फीचर सादर