Realme New Phone Launch Today : बाजारात अनेक वेगवेगळे फोन (Mobile Phones) सध्या लाँच होत आहेत. 5G देखील मोठ्या प्रमाणात डिमांडमध्ये आहे. आता ट्रेडिंगमध्ये असणाऱ्या Realme कंपनीनं दोन नवीन फोन आज लाँच केले आहेत. Realme 11 Series 5G मध्ये आज दोन नवीन स्मार्टफोन (Smartphone) दाखल झाले आहेत. मोबाईल कंपनी Realme आपल्या भारतीय ग्राहकांसाठी Realme 11 5G आणि Realme 11x 5G सादर केले आहे. यासोबतच आज Realme Buds Air 5 देखील लाँच करण्यात आले आहे. काय आहेत फिचर्स आणि किंमत जाणून घेऊयात.
Realme 11 5G
Realme 11 5G फोनमध्ये 6.4-इंच लांबीचा फुल HD+ सॅमोलेड डिस्प्ले आहे, ज्याचा रिफ्रेश रेट 90Hz आहे. फोन MediaTek Dimensity 6020 प्रोसेसरने सुसज्ज आहे. ज्यामध्ये 8GB RAM आणि 256GB स्टोरेज उपलब्ध आहे. फोनमध्ये 5000mAh बॅटरी आणि 33W फास्ट चार्जिंग सपोर्ट आहे. फोटोग्राफीसाठी यामध्ये प्रायमरी कॅमेरा 64MP चा आहे. त्यासोबत 2MP कॅमेरा आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी यात 8MP सेल्फी कॅमेरा मिळेल. Mali G57 MC2 GPU सह MediaTek Dimensity 6100+ चिपसेटसह प्रोसेसर येईल.
Realme 11x 5G
कंपनीनं Realme 11x या स्मार्टफोनच्या सर्व फीचर्सची माहिती अद्याप सार्वजनिक केलेली नाही. मात्र, फोनमध्ये 64 मेगापिक्सलचा AI कॅमेरा आहे. याशिवाय या फोनमध्ये 33 वॅट फास्ट चार्जिंगची सुविधा देखील देणार आहे.
किंमत किती?
Realme 11 हा स्मार्टफोन (8 जीबी + 128 जीबी स्टोरेज) भारतात 18,999 रुपयांपासून उपलब्ध असेल. तर, 8 GB रॅम आणि 256 GB इंटरनल स्टोरेजच्या याच स्मार्टफोनची किंमत 19,999 पासून असेल.
Realme 11x स्मार्टफोन (6 जीबी + 128 जीबी स्टोरेज) 14,999 रुपयांपासून उपलब्ध असेल. तर, 8 GB + 128 GB चा हाच स्मार्टफोन 15,999 रुपयांना मिळेल.
कशी मिळणार सवलत?
दुपारी एक वाजता Realme 11 5G साठी प्री-ऑर्डर बुकिंग सुरू झाली आहे. तर, Realme 11x 5G चा स्पेशल फ्लॅश सेल आज संध्याकाळी 5.30 ते रात्री 8 दरम्यान असेल. स्टेट बँक (SBI) आणि एचडीएफसीच्या (HDFC) ग्राहकांना या फोनवर 1500 रुपयांपर्यंत सवलत मिळेल.
इतर महत्वाच्या बातम्या :
Best 5G Phones : 20 हजारांपेक्षा कमी किमतीत मिळतात 'हे' सर्वोत्तम 5G स्मार्टफोन, फिचर्सही दमदार